---Advertisement---

जोहान्सबर्गमधील टीम इंडियाची ‘ती’ परंपरा ‘कॅप्टन’ राहुलमूळे अबाधित

On: मंगळवार, जानेवारी 4, 2022 1:28 AM
captain kl rahul
---Advertisement---

विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय कसोटी संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. माकिलेतील दुसरा कसोटी सामना सोमवारी (३ जानेवारी) जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स स्टेडियममध्ये सुरू झाला. हा सामना भारतीय संघाला मालिका जिंकण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली (virat kohli) दुखापतीमुळे बाहेर झाल्यानंतर केएल राहुल (kl rahul) याने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. केएल राहुलकडे संघाची धुरा सोपवली गेल्यामुळे एक खास विक्रमही नोंदवला गेला आहे.

भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या पाठीत वेदना होत असलायमुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाल्याचे सांगितले गेले आहे. अशात सलामीवीर केएल राहुलकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान भारतीय संघाचा जोहान्सबर्गमध्ये खेळला जाणारा हा आजपर्यंतच्या इतिहासातील सहावा कसोटी सामना आहे. जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या प्रत्येक कसोटी सामन्यात भारतीय संघाला नवीन कर्णधार लाभला आहे.

भारतीय संघाचा जोहान्सबर्गमधील इतिहास पाहिला, तर संघाने या स्टेडियमवर पहिला सामना १९९२ मध्ये खेळला होता आणि त्याचा निकाल अनिर्णीत राहिला होता. या पहिल्या सामन्यात मोहम्मद अजहरुद्दीन संघाचे कर्णधार होते. भारतीय संघाने याठिकाणी दुसरा सामना सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात १९९७ मध्ये खेळला होता आणि हा सामना देखील अनिर्णीत राहिलेला. त्यानंतर तिसरा सामना २००६ मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात खेळला गेला होता, यामध्ये भारताने विजय मिळवला होता. जोहानसबर्गमध्ये भारताने मिळवलेला हा पहिला विजय ठरला होता.

एमएस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने २०१३ मध्ये जोहान्सबर्गमध्ये चौथा कसोटी सामना खेळला, जो अनिर्णीत राहिला होता. त्यानंतर कर्णधार विराटच्या नेतृत्वात संघाने २०१८ मध्ये याठिकाणी खेळल्या कसोटीत विजय मिळवला होता. त्यानंतर आता केएल राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघ पुन्हा एकदा जोहान्सबर्गच्या मैदानात उतरला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील हा दुसरा सामना आहे आणि भारतीय संघ यामध्ये विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. भारताने जर या सामन्यात विजय मिळवला, तर संघ कसोटी मालिका देखील नावावर करेल.

महत्वाच्या बातम्या –

द्रविडने जागवल्या जोहान्सबर्गमधील पहिल्या शतकाच्या आठवणी; ‘त्या’ साथीदाराचे केले कौतुक

न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये बसलेला ‘तो’ चिमुकला कोण? का होतेय किवी संघाचे कौतुक? वाचा संपूर्ण प्रकरण

निवृत्तीनंतर फावल्या वेळेत क्विंटन डी कॉक जपतोय आपला छंद, मासे पकडतानाचा फोटो केला शेअर

व्हिडिओ पाहा –

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---