कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. अशामध्ये लंडनहून भारतात परतणारी गायिका कनिका कपूरला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यामुळे तिला आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले होते. परंतु तिने या गोष्टीला दुर्लक्षित केले आणि लखनऊमध्ये आपल्या नातेवाईकांसोबत आणि मित्रांबरोबर पार्टी केली.
या गैरजबाबदार वर्तणुकीमुळे नेटिझन्स कनिकावर टीका करत आहेत. त्याचबरोबर कनिकाबद्दल एक खुलासा करण्यात आला आहे.
एका वृत्तानुसार, कोरोना व्हायरसची लागण झालेली कनिका ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, त्याच हॉटेलमध्ये दक्षिण आफ्रिका संघ (South Africa Team) आणि कोचिंग स्टाफही थांबला होता. रविवारी मिळालेल्या माहितीनुसार कनिकाने हॉटेलच्या (Hotel) लॉबीमध्ये जेवण केले आणि त्यानंतर तिने अनेक पाहुण्यांची भेटही घेतली होती.
विशेष म्हणजे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील एकही सामना न खेळता मालिका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. धरमशालामध्ये (Dharamshala) खेळण्यात येणारा पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता.
ज्यानंतर उर्वरित दोन सामने कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे रद्द करण्यात आले होते. दुसरा सामना लखनऊमध्ये खेळण्यात येणार होता आणि ज्या हॉटेलमध्ये दक्षिण आफ्रिका संघ थांबला होता तिथेच गायिका कनिकाही थांबली होती.
आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार एका अधिकाऱ्याने सांगितले की, “जेव्हा दक्षिण आफ्रिका संघ वनडे सामन्यासाठी या हॉटेलमध्ये थांबला होती. परंतु वनडे सामना खेळण्यात आला नाही. तेव्हा तेथेकनिका एका न्यूज चॅनेलच्या कॉन्क्लेव्हमध्ये भाग घेण्यासाठी आली होती.”
“त्यामुळे हे खूप महत्त्वाचे आहे की, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पाहिली जावी आणि हे माहित करून घ्यावे की कनिका यादरम्यान कोणत्या व्यक्तींच्या संपर्कात आली होती,” असेही अधिकाऱ्याने यावेळी सांगितले.
बीसीसीआयने (BCCI) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील ३ सामन्यांच्या मालिकेतील उर्विरत २ सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेचा संघ मागील आठवड्यात मंगळवारी कोलकातावरून (Kolkata) दुबई मार्गाने मायदेशी परतला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कोहली-एबीमध्ये कोण भारी? ऑस्ट्रेलियन दिग्गजाने दिले हे उत्तर
-रोहित एशिया कप खेळला तर या ४पैकी एका खेळाडूला बसावे लागणार घरी
-कोरोना व्हायरसविरुद्ध लढ्यात क्रिकेटपटूंना इंंन्शुरन्स देणार हे देशातील पहिलं राज्य