---Advertisement---

वयाच्या 37व्या वर्षी जिंकलं सुवर्णपदक..! नोव्हाक जोकोविचनं रचला इतिहास

On: रविवार, ऑगस्ट 4, 2024 9:44 PM
---Advertisement---

नोव्हाक जोकोविचनं (Novak Djokovic) पॅरिस ऑलिम्पिक 2024चं सुवर्णपदक जिंकलं आहे. टेनिस एकेरीच्या अंतिम फेरीत सर्बियाच्या जोकोविचनं अत्यंत चुरशीच्या लढतीत कार्लोस अल्काराझचा पराभव केला. या विजयासह नोव्हाकनं टेनिस आणि ऑलिम्पिक इतिहासात अनेक विक्रम केले. 37 वर्षीय नोव्हाक जोकोविच ओपन एरामध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.

नोव्हाक जोकोविचनं (Novak Djokovic) 24 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत पण पॅरिस गेम्सपूर्वी त्याच्या नावावर ऑलिम्पिक सुवर्णपदक नव्हते. त्यामुळेच त्यानं स्पेनच्या कार्लोस अल्काराझविरुद्ध विजयासाठी चिवट झुंज दिली. नोव्हाक आणि अल्काराझ यांच्यातील स्पर्धा किती खडतर होती, याचा अंदाज यावरून लावता येतो की दोन्ही खेळाडू सर्व्हिस मोडू शकले नाहीत. दोन्ही सेट टायब्रेकमध्ये गेले, जे नोव्हाक जोकोविचने जिंकले. शेवटी हा सामना 7-6(3), 7-6(2) असा नोव्हाक जोकोविचच्या नावावर गेला.

या विजयासह नोव्हाक जोकोविच हा चारही ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकणारा जगातील पाचवा खेळाडू ठरला असून त्याच्या नावावर ऑलिम्पिक सुवर्ण पदकही आहे. जोकोविचपूर्वी केवळ स्टेफी ग्राफ, आंद्रे अगासी, राफेल नदाल, सेरेना विल्यम्स यांनाच ही कामगिरी करता आली. आता या चार खेळाडूंसह जोकोविचचं नाव आता करिअर ग्रँडस्लॅम विजेत्यांच्या यादीत आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट बाद होता की नाबाद? डीआरएसवरून मोठा गोंधळ, श्रीलंकन खेळाडूंच्या प्रतिक्रियेनेही वेधले लक्ष
Video : रोहितचा थ्रो हुकला, पण विराटने चित्त्याप्रमाणे चपळता दाखवत श्रीलंकेच्या फलंदाजाला केले रनआऊट
“त्याला भारी वाटायचं जेव्हा मी…” फ्रेंडशिपडेच्या दिवशी धवनला आली जुन्या जोडीदाराची आठवण..!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---