---Advertisement---

वयाच्या 48 व्या वर्षी शोएब अख्तर तिसऱ्यांदा झाला बाप, मुलगी की मुलगा? वाचा सविस्तर

On: शनिवार, मार्च 2, 2024 1:16 PM
shoaib-akhtar
---Advertisement---

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तर शुक्रवारी तिसऱ्यांदा बाप झाला असून त्याच्या घरी मुलगी जन्माला आली आहे. तर त्याने स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. त्याआधी शोएबला मोहम्मद मिकाइल अली आणि मोहम्मद मुजद्दाद अली अशी दोन मुले आहेत. तर यामध्ये  मिकेलचा जन्म 2016 आणि मुजद्दादचा 2019 मध्ये झाला होता. त्यानंतर आता लग्नाच्या 10 वर्षांनी त्याच्या कुटुंबात तिसऱ्या बाळाचं स्वागत केलं आहे. तर शोएबने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली असून यामध्ये बाळाचा चेहरा व नाव दोन्ही शेअर केले आहे. 

याबरोबरच शोएब अख्तरने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले आहे की, “मिकेल आणि मुजद्दिदला आता एक लहान बहीण मिळाली आहे. अल्लाह तालाने आमच्या पदरात गोड मुलगी दिली आहे. 19 शाबान, 1445 एएच, जुम्माच्या नमाजच्या वेळी जन्मलेल्या नूरह अली अख्तरचे स्वागत. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी खूप खूप आभार.” तसेच शोएब अख्तरने आपल्या मुलीचे नाव नूरह अली ठेवले आहे. त्याच्या पत्नीचे नाव रुबाब खान आहे आणि ती त्याच्यापेक्षा 18 वर्षांनी लहान आहे.

शोएब अख्तर हा पाकिस्तान क्रिकेट संघातील एक अत्यंत यशस्वी खेळाडू म्हणून ‘रावळपिंडी एक्सस्प्रेस’ या नावाने आजही प्रसिद्ध आहे. त्याने १९९७ मध्ये पाकिस्तानसाठी पदार्पण केले होते २०११ मध्ये निवृत्ती जाहीर केली होती. यावेळी त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये अनुक्रमे १७८, २४७ आणि १९ विकेट घेतल्या आहेत. सध्या शोएब अख्तर क्रिकेटच्या सामन्यांसाठी समालोचक म्हणून काम करत आहेच त्याशिवाय त्याने स्वतःच्या युट्युब चॅनेलवर सुद्धा सामन्यांनंतरचे विश्लेषण सांगणारी सीरीज सुरु केली आहे. UAE मध्ये ILT20 च्या सामन्यांसाठी त्याने शेवटचे समालोचक म्हणून काम केले होते.

https://www.instagram.com/p/C3-G5ikLpo4/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

दरम्यान, शोएब अख्तर आणि रुबाब खान यांनी 2014 मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांचा पहिला मुलगा झाला होता. तर शोएब अख्तरने 1997 मध्ये पदार्पण केले होते आणि 2011 च्या विश्वचषकात तो शेवटचा सामना खेळला होता.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---