अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना भारतीय क्रिकेट संघाची त्यांच्याशी भेट झाली होती. 2004 मध्ये भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याआधी वाजपेयींना भेटला होता.
त्यावेळी भारत 1985 नंतर 19 वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर जात होता. तसेच भारत-पाकिस्तान सामने पाहण्यासाठी जाणाऱ्या जवळजवळ 20000 भारतीय चाहत्यांचा व्हिसा मंजूर करण्यात आला होता.
भारताच्या संघाची आणि वाजपेयींच्या भेटीबद्दल त्यावेळचे भारतीय संघाचे व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांनी आठवण सांगितली आहे.
शेट्टी यांनी सांगितले की, “भारतीय संघ पाकिस्तानला रवाना होण्याच्या 1 तासआधी वाजपेयींना भेटला होता. त्यावेळी त्यांनी भारतीय संघाला सांगितले की, या दौऱ्यात तुमचा मोटो “खेल भी जितिये, दिल भी जितिये”(खेळही जिंका आणि मनेही जिंका) असा असायला हवा.”
याबरोबरच वाजपेयी यांनी त्यावेळचा भारताचा कर्णधार सौरव गांगुलीला एक बॅटही भेट दिली होती. त्यावर खेलही नहीं दिल भी जितिये, शुभेच्छा असा संदेश लिहिलेला होता. Atal Bihari Vajpayee asked the players to win hearts too apart from matches.
त्यावेळी भारतीय संघाचा सौरव गांगुली कर्णधार होता. तर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहिर खान, मोहम्मद कैफ असे भारतीय संघात खेळाडू होते.
या दौऱ्यात भारतीय संघाने कसोटी मालिका 2-1 आणि वनडे मालिका 3-2 ने जिंकली होती. त्याचबरोबर त्यावेळी भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी चाहत्यांकडून प्रेम मिळाल्याच्या आठवणी अनेक खेळाडू सांगतात.
ट्रेंडिंग घडामोडी-
-टाॅप ७- कारकिर्दीत १६० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारे खेळाडू
-वनडेत विक्रमांचे विक्रम करणारे ५ असे खेळाडू ज्यांचे…
-कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांवर राज्य करणारे ५ खेळाडू