आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला सुरुवातीच्या २ सामन्यात साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यानंतर पुढील २ सामन्यात भारतीय संघाने मोठ्या अंतराने विजय मिळवून जोरदार पुनरागमन केले. शुक्रवारी (५ नोव्हेंबर) भारतीय संघाचा सामना स्कॉटलॅंड संघाविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयात केएल राहुलने मोलाचे योगदान दिले. त्याने या सामन्यात तुफानी अर्धशतक झळकावले. दरम्यान अर्धशतक झळकावल्यानंतर केएल राहुलची गर्लफ्रेंड अथिया शेट्टीने दिलेल्या रिॲक्शनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीने शनिवारी (६ नोव्हेंबर) आपला वाढदिवस साजरा केला. तिला शुभेच्छा देताना केएल राहुलने आपल्या प्रेमाची कबुली दिली. तसेच वाढदिवसाच्या एक दिवसापूर्वी त्याने जोरदार अर्धशतक झळकावून तिला वाढदिवसाची भेटही दिली. त्याने अर्धशतक पूर्ण करताच, जेव्हा बॅट उचलली त्यावेळी रितिका सजदेहच्या मागे उभा असलेली अथिया शेट्टी आनंदात डान्स करताना दिसून आली. तसेच इशारा करून ती काहीतरी म्हणायचा प्रयत्न करत होती.
केएल राहुलने या डावात १९ चेंडूंमध्ये ५० धावांची खेळी केली होती. या संपूर्ण सामन्यात ती स्टेडियममध्ये बसून केएल राहुलला चीयर करताना दिसून आली.
तसेच अथिया शेट्टीच्या वाढदिवसाच्या दिवशी केएल राहुलने तिच्या सोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून “हॅपी बर्थडे माय..” असे लिहून पुढे हार्टचा ईमोजी टाकला होता. यावरून चाहते असा अंदाज बांधत आहेत की, केएल राहुलने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.
तसेच भारत विरुद्ध स्कॉटलॅंड यांच्यात झालेल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या स्कॉटलॅंड संघाकडून जॉर्ज मुंसीने सर्वाधिक २४ तर माईकल लिस्कने २१ धावांचे योगदान दिले होते. स्कॉटलॅंड संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ८५ धावांवर संपुष्टात आला होता. या धावांचा पाठलाग करताना केएल राहुलने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. तर रोहित शर्माने ३० धावांचे योगदान दिले होते. भारतीय संघाने हा सामना ८ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान सामना टाय किंवा अनिर्णीत राहिल्यास काय? घ्या जाणून गणिते
टी२० विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार भावूक; म्हणाला, ‘एका युगाचा अंत झाला’
VIDEO: ‘अंतिम सामन्या’त विकेट घेताच गेलला आनंदाने फुटले पंख, ऑस्ट्रेलियन फलंदाजाला मारली मिठी






