एटीके मोहन बागान एफसीने हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) मधील बंगळुरू एफसीविरुद्धची अपराजित मालिका कायम राखली. पहिल्या हाफमध्ये तुल्यबळ खेळ झाल्यानंतर एटीके मोहन बागानकडून दिमित्रि पेट्राटोसने (६६ मि.) गोल केला आणि या आघाडीच्या बळावर विजय मिळवला. ८५व्या मिनिटाला शिवा नारायणन याने बॉक्समधून टोलावलेला चेंडू गोलपोस्टला लागून माघारी फिरला अन् बंगळुरूची बरोबरीची संधी थोडक्यात हुकली. बंगळुरूचा ८ सामन्यांतील हा पाचवा पराभव ठरला, तर एटीके मोहन बागानने ८पैकी ५ सामने जिंकून १६ गुणांसह तालिकेतील चौथ्या स्थानावरील पकड मजबूत केली.
बंगळुरू एफसीने मागील सामन्यात एफसी गोवाला पराभूत केल्याने त्यांचे मनोबल नक्कीच उंचावले होते. पाचव्या मिनिटाला झेव्हियर हर्नांडेझला सोपी संधी मिळाली आणि त्याला डाव्या बाजूला असलेल्या एटीके मोहन बागानचा गोलरक्षक विशाल कैथला चकवायचे होते. पण, कैथने तितकाच सुरेख बचाव केला अन् बंगळुरूने सामन्यात आघाडी मिळवण्याची आयती संधी गमावली. सुनील छेत्रीला या सामन्यात सुरुवातीपासून मैदानावर उतरवले आणि त्याने चतुराईने गोल करण्याच्या संधीही निर्माण केल्या, परंतु एटीकेचा गोलरक्षक विशालने तितका चांगला बचाव केला. आक्रमकपटूसोबतच छेत्री बचावपटूचीही भूमिका आज बजावताना दिसला आणि त्याच्या अनुभवासमोर एटीकेचे खेळाडू बॅकफूटवर जाताना दिसले. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांचा खेळ तसा तुल्यबल राहिला. हर्नांडेझने गमावलेली सोपी संधी बंगळुरूने साधली असती तर ते आघाडीवर असते. एटीकेचा गोलरक्षक विशाल याने पहिल्या ४५ मिनिटांत चांगला बचाव केला.
बंगळुरूने घरच्या मैदानावर ३३ पैकी ५ सामने गमावले आहेत. पण एटीके एकदाही हिरो आयएसएलमध्ये बंगळुरूकडून पराभूत झालेले नाहीत आणि ही आकडेवारी त्यांची जमेची बाजू होती. ४९व्या मिनिटाला सुनील छेत्रीवर एटीकेच्या खेळाडूकडून टॅकल केला अन् बंगळुरूचा कर्णधार रेफरीकडे पाहत बसला. पण, रेफरीने कोणताच निर्णय न दिल्याने छेत्री नाराज झाला. पण, बंगळुरूचा आक्रमण सुरू झाला आणि रॉय कृष्णा सातत्याने चेंडू घेऊन पेनल्टी क्षेत्रात शिरताना दिसला. हिरो आयएसएलमध्ये बंगळुरूकडून हार न मानलेला एटीके हा एकमेव संघ आहे, परंतु यंदा ही मालिका खंडीत करण्याचा बंगळुरूचा प्रयत्न दिसला. पण, एटीके हार मानणारा संघ नक्कीच नव्हता आणि ६६व्या मिनिटाला दिमित्रि पेट्राटोसने बंगळुरूचा यशस्वी गोलरक्षक गुरप्रीत संधूला चकवले आणि एटीकेला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
3 points away from home! 💚♥️#ATKMohunBagan #JoyMohunBagan #আমরাসবুজমেরুন pic.twitter.com/oTUAIsOVNL
— Mohun Bagan Super Giant (@mohunbagansg) December 3, 2022
रॉय कृष्णा व छेत्री यांना बंगळुरूच्या अन्य खेळाडूंकडून अपेक्षित साथ मिळताना दिसत नव्हती. त्यात ७१व्या मिनिटाला आशिक कुरुनियन चेंडू घेऊन पेनल्टी क्षेत्रात गेला होता, परंतु एटीकेचा दुसरा कोणताच खेळाडू योग्यवेळी तिथे पोहोचला नाही. त्यामुळे एटीकेला दुसरा गोल करता आला नाही. ७३व्या मिनिटाला छेत्रीला मैदानाबाहेर बोलावून लिऑन ऑगस्टाईनला बंगळुरूने उतरवले. ७८व्या मिनिटाला १८ यार्ड बॉक्सच्या कॉर्नरवरून फ्री किक मिळूनही बंगळुरूला बरोबरीचा गोल करता आला नाही. सामन्यात आघाडी घेतल्यानंतर १७ सामन्यांपैकी दोनच सामन्यांत एटीकेला हार पत्करावी लागली होती आणि त्यामुळे बंगळुरूचे पुनरागमन तितके सोपे नक्की नव्हते. एटीकेने अखेरच्या १० मिनिटांत चेंडूवर ताबा राखताना बंगळुरूच्या खेळाडूंना पूर्णपणे निष्प्रभ ठेवले होते. अखेरच्या काही मिनिटांत बंगळुरूकडून बरोबरीचा गोल करण्याचे प्रयत्न झाले अन् शिवा नारायणनने बरोबरीचा गोल केलाच होता, परंतु पोस्ट आडवी आली. एटीके मोहन बागानचा १-० असा विजय निश्चित झाला.
निकाल : एटीके मोहन बागान १ ( दिमित्रि पेट्राटोस ६६ मि. ) विजयी वि. बंगळुरू एफसी ०.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताची चौकडी तंबूत, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडेतच भारत करतोय संघर्ष
धोनीसारखाच शांत खेळाडू बनणार चेन्नईचा कर्णधार? बॅट्टींग कोचने केेले मत व्यक्त