विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ ऑस्ट्रेलिया मंगळवारी (7 नोव्हेंबर) अडचणीत सापडला. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात ग्लेन मॅक्सवेल व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा एकही खेळाडू चमकदार कामगिरी करू शकला नाही. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तान संघाचे सर्वांना आवाक करणारे प्रदर्शन केले. असे असले तरी, ऑस्ट्रेलियाच्या डावातील सातवी विकेट वादाचे कारण ठरत आहे.
मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याच्या रुपात अफगाणिस्तान संघाला या सामन्यात सातवी विकेट मिळाली. स्टार्कने या सामन्यात 7 चेंडूत 3 धावांची खेळी केली आणि यष्टीरक्षक इकरान अलिखिल याने अप्रतिन झेल घेतल त्याला तंबूत धाडले. यावेळी स्टार अष्टपैलू राशिद खान गोलंदाजी करत होता. चेंडू स्टार्कच्या बॅटला लागून यष्टीरक्षकाच्या हातात गेल्याचा भास यावेळी सर्वांना झाला. राशिद खान देखील आपल्याला विकेट मिळाली, या भावणेने अपील न करताता थेट जल्लोष करू लगाला. यष्टीरक्षकाला देखील विकेटबाबत पूर्ण आत्मविश्वास होता. अशात पंचांनी देखील एक क्षण थांबून स्टार्कला बाद घोषित केले.
असे असले तरी, स्टार्क याला चेंडू बॅटला लागली नाही, अशी शंका होती. स्टार्कने काही क्षण डीआरएस घेण्याचा विचार केला, पण विरोधी संघाचा आत्मविश्वास पाहून त्याने तसे केले नाही. पण स्टार्क आणि ऑस्ट्रेलियन संघाची ही सर्वात मोठी चूक ठरली. रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर स्टार्कची बॅट आणि चेंडू यांचा कुठेच संपर्क आला नाही, असे दिसले. मात्र, फलंदाजी करणाऱ्या संघाकडून याबाबत डीआरएस घेतला गेला नसल्याने मैदानी पंचांचा निर्णय अंतिम राहिला. परिणामी स्टार्कला खेळपट्टी सोडावी लागली.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने 5 विकेट्सच्या नुकसानावर 291 धावांपर्यंत मजल मारली. 292 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ मैदानात आला. पण फलंदाजांनी झटपट विकेट्स गमावल्या. संघाची धावसंख्या 91 असताना ऑस्ट्रेलियाने सातवी विकेट गमावली. (AUS vs AFG । There was no edge, but Mitchell Starc didn’t take the review)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेजलवूड, ऍडम झम्पा.
अफगाणिस्तान – रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक.
महत्वाच्या बातम्या –
पंजाबने सय्यत मुश्ताक अली ट्रॉफी जिंकल्यानंतर तुडला इमोशन्सचा बांध, कर्णधार मनदीपची पत्नी भर मैदानात रडली
इब्राहिमच्या शतकानंतर राशिदचा धमाका, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292 धावांचे कठीण लक्ष्य