---Advertisement---

Champions Trophy; कांगारुंचा ऐतिहासिक विजय, इंग्लंडचा बट्याबोळ!

---Advertisement---

ऑस्ट्रेलियन संघाने शानदार पद्धतीने इंग्लंड संघाचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 351 धावा केल्या,  पण जोश इंगलिसच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने सहज साध्य केला. जेव्हा इंग्लंडने 350 पेक्षा जास्त धावा केल्या तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करू शकेल असे कोणालाही वाटले नव्हते. पण त्यांच्या फलंदाजांच्या बळावर ऑस्ट्रेलियन संघ चमत्कार करण्यात यशस्वी झाला.

ऑस्ट्रेलियाने धावांचा पाठलाग करून इतिहास रचला, एका झटक्यात मोडला अनेक वर्षांचा जुना विक्रम

ऑस्ट्रेलियाच्या संघाने 352 धावांचा पाठलाग करून इतिहास रचला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील हा सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग आहे. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा विक्रम मोडला आहे. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात श्रीलंकेने भारताविरुद्ध 322 धावांचे लक्ष्य गाठले. आता ऑस्ट्रेलियन संघाने त्यांना मागे टाकले आहे.

एकेकाळी ऑस्ट्रेलियाने 27 धावांत दोन विकेट गमावल्या, ज्यामुळे कांगारु संघ अडचणीत सापडल्याचे दिसत होते. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडसारखे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यानंतर मॅथ्यू शॉर्ट आणि मार्नस लाबुशेन यांनी डावाची सांभाळला. या दोन्ही खेळाडूंनी शिस्तबद्ध फलंदाजी दाखवली. शॉर्टने 63 आणि लाबुशेनने 47 धावा केल्या. जेव्हा हे दोन्ही फलंदाज बाद झाले. त्यानंतर अ‍ॅलेक्स कॅरी आणि जोश इंगलिस क्रीजवर आले. या दोन्ही खेळाडूंनी इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपले. कॅरीने 69 धावा केल्या. दुसरीकडे, जोस इंगलिसने ऑस्ट्रेलियन संघाला विजय मिळवून दिल्यानंतरच त्याने विश्रांती घेतली. त्याने 86 चेंडूत 120 धावा केल्या, ज्यात 8 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.

सामन्यात दोन्ही संघांचे गोलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाहीत. इंग्लंडकडून बेन डकेटने 165 धावा केल्या. तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनला आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो रूटने 68 धावांचे योगदान दिले. कर्णधार जोस बटलरला फक्त 23 धावा करता आल्या. या खेळाडूंमुळेच इंग्लंड संघ 350 पेक्षा जास्त धावा करण्यात यशस्वी झाला.

हेही वाचा-

WPL: यूपीचा दिल्लीवर 33 धावांनी शानदार विजय! जुना बदला केला पूर्ण
IND vs PAK: दुबईतील खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणार की फलंदाजांना? सामन्यापूर्वी गिलने स्पष्टच सांगितल
“स्वार्थ सोड बाबर!” – भारताशी लढतीच्या आधी माजी खेळाडूंची तुफान टीका

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---