---Advertisement---

विजयानंतर गगनात मावेना कमिन्सचा आनंद, पण व्यक्त केली ‘या’ गोष्टीची चिंता, म्हणाला, ‘आताही वाटतंय की…’

On: रविवार, नोव्हेंबर 5, 2023 12:54 PM
Australia
---Advertisement---

पाच वेळचा चॅम्पियन असलेला ऑस्ट्रेलिया संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या स्पर्धेत त्यांना सुरुवातीच्या दोन सामन्यांवर पाणी सोडावे लागले होते. मात्र, त्यांनी दमदार पुनरागमन करत पुढील पाचही सामने जिंकले. त्यांचा सातवा सामना आणि स्पर्धेचा 36वा सामना इंग्लंडविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद येथे पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 33 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर कर्णधार पॅट कमिन्स भलताच खुश झाला. त्याने मोठे विधान केले.

नाणेफेक गमावत ऑस्ट्रेलिया संघ या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने मार्नस लॅब्युशेन याच्या 71 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 49.3 षटकात सर्व विकेट्स गमावत 286 धावा केल्या. या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाचा डाव 48.1 षटकात अवघ्या 253 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 33 धावांनी खिशात घातला.

सलग पाचव्या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने खेळाडूंचे कौतुक केले. तो म्हणाला की, सुरुवात कठीण होती, पण आम्ही विजय मिळवण्याचा मार्ग शोधला. कमिन्सने क्षेत्ररक्षणाविषयीदेखील भाष्य करत म्हटले की, याबाबतीतील दर्जा उंचावला आहे. प्रत्येक खेळाडू पूर्ण योगदान देत आहे.

कमिन्सचे विधान
कमिन्स म्हणाला की, “शानदार, खेळाडूंनी शानदार खेळ दाखवला. सुरुवात कठीण होती, पण प्रत्येक सामन्यात विजयाचा मार्ग शोधला आहे. आताही वाटत आहे की, आम्ही आमचे सर्वोत्तम खेळले नाहीये. मात्र, प्रत्येक सामन्यातून नवीन मॅचविनर येत आहेत. क्षेत्ररक्षणात आमचा दर्जा खूपच उंचावला आहे आणि प्रत्येकजण पूर्ण समर्पणाने खेळत आहे.”

‘प्लेइंग इलेव्हन निवडणे कठीण’
कमिन्स पुढे बोलताना म्हणाला की, “ऍडम झम्पा खूपच शानदार गोलंदाजी करत आहे. तो आमचा मॅचविनर आहे. मॅक्सवेल आणि मार्शही आमच्याकडे आहेत, तेव्हा असं वाटतं की, आम्ही एक सशक्त संघ आहोत. आम्हाला प्लेइंग इलेव्हन निवडणे कठीण होईल.”

झम्पाची कमाल
फलंदाजीत एकटा लॅब्युशेन चमकला, तर गोलंदाजीत ऍडम झम्पा याने कमाल केली. त्याने यावेळी इंग्लंड संघाच्या फलंदाजांना घाम फोडला. त्याने 10 षटके गोलंदाजी करताना फक्त 21 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, मार्कस स्टॉयनिस यानेही 1 विकेट घेतली. (aus vs eng captain pat cummins statement after win the match against england)

हेही वाचा-
‘सर्व माझ्यामुळेच झालं…’, सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडताच तुटलं बटलरचं काळीज, चूकही टाकली सांगून
Syed Mushtaq Ali Trophy: SRHच्या खेळाडूने आयुष बदोनीच्या खेळीवर फेरले पाणी, रियान परागचा संघ फायनलमधून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---