माजी भारतीय खेळाडू सुनिल गावसकर यांनी एक अनोखी प्रतिक्रिया दिली आहे. गावसकर यांनी इशांत शर्माला ऑस्ट्रेलियाला रवाना करण्याची मागणी केली आहे. गावसकर म्हणाले, “जर ईशांत शर्मा थोडे फार षटके टाकू शकत असेल तर त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवून दिले पाहिजे.”
एॅडलेड कसोटी सामन्यात निराशाजनक पराभव ओढवल्यामुळे सुनिल गावसकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना गावसकर म्हणाले, मोहम्मद शम्मीला दुखापत होणे हा भारतीय संघासाठी खुप मोठा धक्का आहे. ते म्हणाले, “हा एक मोठा धक्का आहे, कारण शमीकडे विकेट घेण्याची क्षमता आहे. तो आपल्या बाऊंसर आणि यॉर्करने फलंदाजांना अडचणीत आणतो. जर तो खेळणार नसेल तर भारतीय संघापुढे खुप मोठी समस्या निर्माण होवू शकते.”
इशांत शर्माला लवकरच ऑस्ट्रेलियासाठी पाठवावे
सुनिल गावसकर यांनी सल्ला दिला आहे की पुढच्या विमानाने इशांत शर्माला ऑस्ट्रेलियाला पाठवायला हवे. त्यांच्या म्हणण्यानुसार जर इशांत शर्मा एका दिवसात कमीत कमी 20 षटके गोलंदाजी करू शकत असेल तर त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवावे. गावसकर यांच्या मते क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर इशांत शर्मा शेवटच्या दोन सामन्यात भाग घेवू शकतो. ते म्हणाले, ” इशांत शर्मा सुद्धा या दौर्यावर गेला नाही. जर तो फिट असेल तर त्याला लगेच पाठवले पाहिजे. जर तो एका दिवसात 20 षटके टाकण्यासाठी सक्षम आहे, तर त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवले पाहिजे. ज्यामुळे सिडनी कसोटी सामन्यासाठी तयार राहील.”
भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने 8 विकेट्सने जिंकला होता. या सामन्याच्या दुसर्या डावात भारतीय संघाने इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या नोंदवली होती. या सामन्यात भारतीय संघ 36 धावसंख्येवर गुंडाळला होता.
इशांत शर्माची कसोटीतील कामगिरी
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने 97 कसोटी सामन्यांतील 175 डावांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. यामधे त्याने 32.39 सरासरीने 297 विकेट्स मिळवल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 9620 धावा दिल्या आहेत. गेल्या काही वर्षात भारताच्या कसोटी सामन्यांतील गोलंदाजी आक्रमणाचा तो प्रमुख आधारस्तंभ आहे.
संबधित बातम्या:
– भारतीय संघाला मोठा धक्का, मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर
– AUS vs IND Test Live : बर्न्सच्या अर्धशतकी खेळीने कांगारूचा भारतावर ८ विकेट्सने विजय; १-० ने घेतली आघाडी
– ..म्हणून त्यांना लक्ष्य करणे चुकीचे; सुनील गावसकरांनी केली भारतीय फलंदाजांची पाठराखण