कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही काळ क्रिकेट सामन्यांच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, दीर्घ काळानंतर जैव सुरक्षित वातावरणात क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी आगामी क्रिकेट मालिकाही जैव सुरक्षित वातावरणात पार पडेल.
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. 27 नोव्हेंबर पासून 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या मालिकेसाठी मैदानावर कठोर परिश्रम घेत आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2018-19 या कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली होती. ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर कसोटी मालिका जिंकणारा विराट हा एकमेव भारतीय कर्णधार आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण विराट कोहलीने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या कामगिरीवर नजर टाकणार आहोत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून विराटची कामगिरी
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 कसोटी सामने खेळले आहे.यामध्ये 4 सामन्यात भारतीय संघाचा विजय झाला आहे, तर 3 सामन्यात या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. विराटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या दोन्ही कसोटी मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला आहे.
भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात विजय मिळवण्याची टक्केवारी 44.44 इतकी आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत कर्णधार म्हणून विराटची कामगिरी
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 17 वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये 11 सामन्यात भारतीय संघाचा विजय झाला आहे, तर 6 सामन्यात या संघाला पराभवाला सामोरे जावं लागलं. म्हणजेच भारतीय संघाची विजयाची टक्केवारी 64.70 इतकी आहे.
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वनडे मालिका खेळल्या आहेत. त्यापैकी 2 मालिकेत या संघाने विजय मिळवला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेत विराटची कामगिरी
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या 7 टी20 सामन्यांपैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे तर 4 सामन्यात या संघाचा पराभव झाला आहे. भारताची विजयाची टक्केवारी 25 आहे.
विराटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या 3 टी20 मालिकेत भारतीय संघाने केवळ 1 मालिका जिंकली आहे, तर एक मालिका अनिर्णित होती.
ट्रेंडिंग लेख-
सातत्याला सलाम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक सरासरीने धावा करणारे ३ भारतीय धडाकेबाज फलंदाज
ऑस्ट्रेलियन फलंदाजांना ‘सळो की पळो’ करून सोडणारे ३ भारतीय गोलंदाज
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३ दिग्गज कर्णधार, ज्यांच आयपीएल कर्णधारपद मात्र धोक्यात
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! रोहित आणि ईशांत शर्मा पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यातून बाहेर?
टीम इंडियाचे ४ माजी खेळाडू श्रीलंकेतील LPL स्पर्धेत गाजवणार मैदान; ‘या’ संघात समावेश