ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर (Australia Tour Of Pakistan) असून उभय संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका (AUS vs PAK Test Series) सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना (Second Test) कराची येथे सुरू असून पाहुणा ऑस्ट्रेलिया संघ सामन्यात मजबूत स्थितीत आहे. दुसऱ्या दिवसापर्यंत ऑस्ट्रेलिया संघाने ११७ षटकांमध्ये ४ बाद ३३२ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजा १५५ धावा आणि ट्रॅविस हेड १४ धावांवर खेळत आहे. या सामन्यादरम्यान स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) शतकी खेळीच्या दिशेने वाटचाल करत होता, परंतु पाकिस्तानचा खेळाडू फहिम अश्रिफ (Faheem Ashraf) याच्यामुळे त्याच्या शतकी खेळीवर पाणी फेरले गेले.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर (३६ धावा) आणि मार्नस लॅब्यूशेन (० धावा) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर ख्वाजा आणि स्मिथने संघाचा डाव पुढे नेला. त्यांनी बचावात्मक खेळी करत तिसऱ्या विकेटसाठी ४०९ चेंडूंचा सामना करताना १५९ धावांची भागीदारी रचली. मात्र पाकिस्तानचे खेळाडू हसन अली आणि फहिम अश्रिफ यांनी मिळून स्मिथला झेलबाद करत त्यांची भागीदारी मोडली.
स्मिथ २१४ चेंडूंचा सामना करताना ७ चौकारांच्या मदतीने ७२ धावांवर खेळत होता. अशात डावातील ८९ वे षटत टाकण्यासाठी आलेल्या वेगवान गोलंदाज हसन अली याच्या पाचव्या चेंडूवर स्मिथने यष्टीमागे साधारण शॉट मारला. परंतु फहिम अश्रम तिथे आधीपासूनच सावध असल्यामुळे त्याने स्मिथचा अचूक झेल घेतला. त्यामुळे शतक करण्यापूर्वीच स्मिथ पव्हेलियनला परतला. इतक्या सहज आपली विकेट गमावल्यामुळे स्मिथ निराश झाल्याचे दिसले. तो जाताना डोके खाली घालून मैदानाबाहेर गेला.
At the very end of the day Steve Smith is caught napping.
📝 BLOG https://t.co/oJbLR2TMpT
📲 MATCH CENTRE https://t.co/D3A7JKB25Q
📺 WATCH #PAKvAUS via @kayosports https://t.co/TdWj8mcO9d pic.twitter.com/kPXWcTUHCu— Fox Cricket (@FoxCricket) March 12, 2022
पहिल्या कसोटीतही स्मिथला करता आले नव्हते शतक
३२ वर्षीय स्मिथने मागील पहिल्या कसोटी सामन्यातही चांगली खेळी केली होती. तो १९६ चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांच्या मदतीने ७८ धावा करू शकला होता. त्याच्याव्यतिरिक्त उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्यूशेन हे नव्वदीत बाद झाले होते. ख्वाजा १५ चौकारांच्या साहाय्याने ९७ धावांवर बाद झाला होता. तर लॅब्यूशेन १२ चौकारांच्या मदतीने ९० धावांवर आपली विकेट गमावून बसला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन महिलांची शंभरी! केली पुरुष संघांनाही न जमलेली ‘अद्वितीय’ कामगिरी
आरसीबीला आतापर्यंत लाभलेत ६ कर्णधार, फाफ असेल सातवा; जाणून घ्या आतापर्यंतच्या कॅप्टन्सचे आकडे
‘आम्ही विजतेपद मिळवणार!’ आयपीएल २०२२ साठी ‘रॉयल’ जयस्वालने बांधला चंग