सिडनी कसोटीत मोहम्मद रिझवान, आगा सलमान आणि आमेर जमाल यांच्या खेळीने पाकिस्तानची इज्जत वाचवली. एकवेळी अवघ्या 50 धावांत 4 विकेट गमावलेल्या पाकिस्तान संघाने या तीन फलंदाजांच्या झटपट अर्धशतकांच्या जोरावर संघाची धावसंख्या 300 च्या पुढे नेले. 9व्या क्रमांकावर येताना जमालने स्फोटक खेळी खेळली आणि 97 चेंडूत 82 धावा केल्या. जमालच्या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. कर्णधार पॅट कमिन्स याने सलग तिसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील या शेवटच्या सामन्यात पाकिस्तान कर्णधार शान मसूद (Shan Masood) याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली. दोन्ही सलामीचे फलंदाज एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतले. अब्दुल्ला शफिक याला मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याने पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि सॅम अयुब (Sam Ayub) याला जोस हेजलवूड (Jos Hazlewood) याने पायचीत केले.
बाबर आझम याने (26) कर्णधार शान मसूदला काही काळ साथ दिली मात्र तो पुन्हा एकदा पॅट कमिन्स (Pat Cummins) याचा बळी ठरला. 47 धावा झाल्या तोपर्यंत सौद शकील (Saud Shakeel) (5) यालाही कमिन्सने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शान मसूद चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता पण तो संघाची 96 धावासंख्या आसताना मिचेल मार्श (Mitchell Marsh) याच्या चेंडूवर बाद झाला. त्याने 35 धावांची खेळी खेळली.
अर्धा संघ 100 धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि आगा सलमान (Agha Salman) याने वेगवान पद्धतीने धावा काढण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 94 धावांची जलद भागीदारी झाली. एकूण 190 धावांवर मोहम्मद रिझवान 103 चेंडूत 88 धावा करून बाद झाला. त्यानंतर 67 चेंडूत 53 धावांची खेळी करून सलमान आघानेही आपली विकेट गमावली.
रिझवान आणि सलमान बाद झाल्यानंतर आमेर जमाल याने दमदार खेळी केली. त्याने 82 धावा करत पाकिस्तानला 300 च्या पुढे नेले. आमिरला साजिद खान (15) आणि मीर हमजा (7) यांचीही चांगली साथ मिळाली. तर कमिन्सच्या 5 विकेट्सशिवाय स्टार्कला दोन विकेट्स घेण्यात यश आले. नेथन लायन, हेझलवूड आणि मार्शला प्रत्येकी 1-1 विकेट्स मिळाल्या. (AUS vs PAK Pakistan bowled out for 313 in first innings skipper Pat Cummins takes five wickets)
हेही वाचा
रोहित शर्माच ‘सिक्सर किंग’! 2023 मध्ये मारले विक्रमी षटकार; 10 वर्षात सातव्यांदा केला असा पराक्रम
ऑस्ट्रेलियाकडून तिसऱ्या वनडेत टीम इंडियाचा 190 धावांनी पराभव, कांगारूंनी 3-0 असा उडवला धुव्वा