Third Umpire Stuck In Lift, AUSvsPAK: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 360 धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघात काट्याची टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 150 हून अधिक धावांची आघाडीही घेतली आहे. मात्र, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज बाद झाले आहेत. असे असले, तरीही सामन्यादरम्यान घडलेल्या एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. लंचनंतर सामना थोड्या वेळासाठी रोखण्यात आला होता. यामागील कारण जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
थर्ड अंपायर लिफ्टमध्ये अडकले
झाले असे की, सामन्यातील थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ (Third Umpire Richard Illingworth) हे लिफ्टमध्ये अडकले होते. त्यामुळे ते त्यांच्या सेटअपमध्ये लवकर पोहोचू शकले नाहीत. यामुळे मैदानी पंचांनी सामना काही वेळासाठी रोखण्याचा निर्णय घ्यावा लागला. जेव्हा खेळाडूंना सामना रोखण्यामागील कारण सांगितले गेले, तेव्हा त्यांनाही हसू फुटले. डेविड वॉर्नर (David Warner) यावेळी स्वत:ला हसण्यापासून रोखू शकला नाही. त्याचा यादरम्यानचा फोटोही सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
The game is delayed because the third umpire … is stuck in the lift #AUSvPAK pic.twitter.com/eSuKyPQp56
— cricket.com.au (@cricketcomau) December 28, 2023
Match paused at the MCG due to the 3rd umpire being stuck in the lift.
David Warner couldn't control his laugh after knowing this. ???? pic.twitter.com/RaoGNdDo2O
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 28, 2023
3rd umpire is back…..!!!!!
– He was stuck in the lift as match was delayed for few minutes at MCG. pic.twitter.com/IKBOcINUSM
— Johns. (@CricCrazyJohns) December 28, 2023
कमिन्सने पूर्ण केले विकेट्सचे पंचक
मैदानावर खेळाडू एकमेकांशी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते की, सामना सुरू होण्यात वेळ का लागत आहे. मैदानी पंचांनी त्यांना स्थितीविषयी सांगितले. काही वेळानंतर इलिंगवर्थ त्यांच्या जागी परतले आणि खेळ पुन्हा सुरू झाला. सामन्याविषयी बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने पाच विकेट्स घेताच पाकिस्तानचा पहिला डाव 264 धावांवर संपुष्टात आला. तसेच, त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 318 धावा केल्या होत्या.
लायनने घेतल्या 4 विकेट्स
कमिन्सने शानदार प्रदर्शन केले. त्याने 48 धावा खर्च करत 5 विकेट्स हॉल पूर्ण केले. त्याच्यानंतर नेथन लायन यानेही आपल्या फिरकीची जादू दाखवली. त्याने 18.5 षटकात 73 धावा खर्चत 4 विकेट्स नावावर केल्या. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 54 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला अवघ्या 6 धावांवर पहिले दोन धक्के बसले. उस्मान ख्वाजा दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर मोहम्मद रिझवान याने त्याला झेलबाद केले.
लंचपूर्वी अखेरच्या चेंडूवरही ऑस्ट्रेलियाला धक्का बसला. मार्नस लॅब्यूशेन लेग साईडला एक शॉट मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 318 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान 1 बाद 124 धावांवर सुस्थितीत दिसत होता. मात्र, विश्वविजेता कर्णधार कमिन्सच्या शानदार गोलंदाजीमुळे पाकिस्तानला 6 बाद 194 धावांवर पोहोचवले. त्यामुळे संघाचा डाव पूर्णपणे ढासळला. (aus vs pak test the reason delays play in australia vs pakistan 2nd test match third umpire stuck in lift see photos)
हेही वाचा-
Video: सामना भारत-आफ्रिकेचा, पण मैफील लुटली RCBच्या चाहत्याने; थेट किंग कोहलीकडून जर्सीवर घेतला Autograph
अर्रर्र! KBCमध्ये 13व्या प्रश्नावर इशान-स्मृतीने सोडला खेळ, सचिनविषयी होता प्रश्न; जिंकले असते ‘एवढे’ लाख






