ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी स्कॉटलंडच्या दौऱ्यावर आहे. मालिकेतील पहिला सामना खूपच रोमांचक झाला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने लक्ष्याचा पाठलाग करताना 58 चेंडूत 155 धावा करून विजय मिळवला. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने ऑस्ट्रेलियासाठी 25 चेंडूत 320 च्या स्ट्राईक रेटने 80 धावा केल्या. ज्यामध्ये 12 चौकार आणि 05 षटकारांचा समावेश होता. या झंझावती खेळीसह हेडने विश्वविक्रम रचला आहे.
हेडने पॉवरप्लेमध्ये त्याच्या डावात सुरुवातीच्या 73 (22 चेंडू) धावा केल्या. ज्यासह त्याने टी20 इंटरनॅशनलमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या बनवण्याचा विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगच्या नावावर होता. 2020 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये स्टर्लिंगने 25 चेंडूत 67 धावा केल्या. तर या यादीत तिसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू काॅलीन मुनरो आहे. त्याने 2018 मध्ये 66 धावा केल्या होत्या.
टी20 इंटरनॅशनलच्या पॉवरप्लेमध्ये ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम केला. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात पॉवरप्लेमध्ये ऑस्ट्रेलियाने 113/1 धावा केल्या होत्या. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता. अफ्रिकन संघाने 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना पाॅवरप्लेमध्ये 102/0 धावा केल्या होत्या.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने 20 षटकात 154/9 धावा केल्या. संघासाठी सलामीला आलेल्या मुनसेने सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 16 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 28 धावा केल्या.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने 9.4 षटकांत 156 धावा करून विजय मिळवला. ट्रॅव्हिस हेडने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 25 चेंडूत 12 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. याशिवाय कर्णधार मिचेल मार्शने 12 चेंडूंत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 39 धावा केल्या. तर जोश इंग्लिशने 13 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 27* धावा केल्या. आशाप्रकारे कांगारुंनी हा सामना सहजरित्या मोठ्या फरकाने जिंकला.
हेही वाचा-
टीम इंडिया सावध राहा, बांगलादेश देऊ शकतो ‘जोर का झटका’!
‘विराट धोनी नाही तर हा क्रिकेटपटू आवडीचा’ यशस्वी जयस्वाल म्हणाला, “त्याच्याकडून खूप शिकायला…”
काय सांगता! संपूर्ण संघ 10 रन्सवर ऑलआऊट, अवघ्या 5 चेंडूत संपला सामना!