ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका संघाला (Sri Lanka Cricket Team) टी२० मालिकेत चार सामन्यांतील पराभवांनंतर मेलबर्न येथे पार पडलेल्या पाचव्या सामन्यात यश आले. ५ सामन्यांची टी२० मालिका श्रीलंकेने गमावली असली तरी संघाने पाचव्या सामन्यात ५ विकेटने ऑस्ट्रेलियाला पराभुत केले आहे. ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेसमोर (AUS vs SL) १५५ धावांचे आव्हान ठेवले. हे लक्ष्य श्रीलंका संघाने २० व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर गाठले. श्रीलंका संघाचा कुसल मेंडिस (Kusal Mendis) हा खेळाडू या सामन्याचा नायक राहिला. तो एका महिन्यापुर्वी संघाचा भाग सुद्धा नव्हता. त्याच्यावर श्रीलंका संघाने १ वर्षासाठी प्रतिबंध घातला होता.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार ऍरॉन फिंच सलामीसाठी आला व त्याने ८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण दोन्ही सलामीवीरांनी फक्त १२ धावांत पव्हेलीयन गाठले. जाॅश इंग्लिस आणि मॅक्सवेलने डाव सांभाळला. परंतु हे दोघेही मोठी खेळी करण्यास अपयशी ठरले. मार्कस स्टाॅयनिसही जास्त वेळ टिकू शकला नाही. मॅथ्यू वेडने ऑस्ट्रेलिया संघाला यश मिळवण्यास मदत केली. त्याने २७ चेंडूत २ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने २० षटकात ६ गडी गमावत १५४ धावा केल्या. श्रीलंकेकडून लाहिरु कुमारा आणि दुष्मंता चमीरा यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने ७१ धावांवरच ४ गडी गमावले होते. अशात संघाला कुसल मेंडिसने संघाला यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. त्याला गतवर्षी क्रिकेट श्रीलंकेने इंग्लंडमध्ये अनुशासनहीनतेच्या आरोपाखाली मायदेशी पाठवले होते आणि त्यानंतर एक वर्षाची बंदी घातली होती. गेल्या महिन्यात श्रीलंकेच्या बोर्डाने ही बंदी ६ महिन्यांत संपवली आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात स्थान दिले. मालिकेतील शेवटच्या सामन्यात मेंडिसने आपली क्षमता दाखवली.
सलामीला आलेल्या मेंडिसने कठीण परिस्थितीत संयमी खेळी खेळली आणि चांगली अर्धशतक झळकावले. त्याने कर्णधार दासुन शनाकासोबत पाचव्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. मेंडिस ५८ चेंडूत ५ चौकार, १ षटकार ६८ धावा केल्या. शेवटच्या षटकात श्रीलंकेला ९ धावांची गरज होती. ज्यामध्ये कर्णधार शनाकाने एका षटकारासह ८ धावा काढल्या. तो षटकाच्या चौथ्या चेंडूवर बाद झाला, पण त्याचा सामन्याच्या निकालावर परिणाम झाला नाही. श्रीलंकेने हा सामना जिंकला.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल लिलावात बोली लागली नाही, पण टीम इंडियात एंट्री करणारा कोण आहे सौरभ कुमार? (mahasports.in)






