मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 8 बाद 258 धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी अजून 141 धावांची तर भारताला विजयासाठी 2 विकेट्सची गरज आहे.
या सामन्यात भारताने दुसरा डाव 8 बाद 106 धावांवर घोषित करत पहिल्या डावातील 292 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली.
त्यांनी सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंच(3) आणि मार्कस हॅरिस(13) यांची विकेट लवकर गमावल्या. त्यानंतर काहीवेळात उस्मान ख्वाजा(33), शॉन मार्श(44), मिशेल मार्श(34), ट्रेविस हेड(10) आणि टीम पेन(26) हे थोडीफार लढत देऊन बाद झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची आवस्था 61.3 षटकात 7 बाद 176 धावा अशी झाली होती.
मात्र त्यानंतर मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी 8व्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी तोडण्यात मोहम्मद शमीला यश आले. त्याने स्टार्कला 18 धावांवर बाद केले. त्यानंतर नॅथन लायनने कमिन्सची साथ देताना भारताच्या गोलंदाजांना दिवसाखेर यश मिळू दिले नाही.
या दोघांनी मिळून 9 व्या विकेटसाठी नाबाद 43 धावांची भागीदारी रचली आहे. त्यामुळे या सामन्याच्या निकालासाठी पाचव्या दिवसाची वाट पहावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचे तळातले फलंदाज कमिन्स(61*), स्टार्क(18) आणि लायनने(6*) मिळून 85 धावा केल्या आहेत.
या डावात भारताकडून रविंद्र जडेजाने तीन तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन आणि इशांत शर्माने एक विकेट घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–हा आहे यावर्षीचा रिषभ पंतचा सर्वोत्तम झेल, पहा व्हिडिओ
–जेव्हा तूला कॅंटीन सुरु कराव लागले तेव्हा मयांक काॅफी प्यायला येईल- शास्त्री
–मेलबर्न कसोटीत खेळत असेल्या खेळाडूच्या भावाला अटक