सध्या सर्वत्र आशिया चषक 2022 ची धामधूम सुरू आहे. आशिया चषकानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक 2022 खेळला जाणार आहे. या विश्वचषकासाठी यजमान ऑस्ट्रेलियाने गुरुवारी (01 सप्टेंबर) 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात सर्वांना चकित करणारे एक नाव आहे, ते म्हणजे सिंगापूरचा घातक अष्टपैलू टीम डेविड याचे. डेविडलाही टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात जागा मिळाली आहे.
डेविडला (Tim David) वगळता ऑस्ट्रेलियाच्या संघात सर्व तीच नावे आहेत, जी मागील युएईतील टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) होती. तसेच टी20 विश्वचषकासाठी निवडलेला हाच संघ आयसीसीची स्पर्धा खेळण्यापूर्वी भारत दौऱ्यावर येईल. मात्र धाकड सलामीवीर डेविड वॉर्नर या संघाचा भाग नसेल. त्याला आगामी टी20 विश्वचषकापूर्वी विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्यासाठी कॅमरॉन ग्रीन भारत दौऱ्यावर जाईल.
सिंगापूरचा असूनही ऑस्ट्रेलियाकडून का खेळणार डेविड?
टीम डेविड याचे आई-वडील ऑस्ट्रेलियन आहेत. परंतु ते सिंगापूरमध्ये स्थायिक झाले आहेत. डेविडही सिंगापूरमध्येच लहानाचा मोठा झाल्याने तो याच संघाकडून क्रिकेट खेळतो. मात्र आता ऑस्ट्रेलिया बोर्डाने त्याला ऑस्ट्रेलिया संघात सहभागी करण्याचा निर्णय घेतला आहे. टी20 विश्वचषकाबरोबरच भारत दौऱ्यावरही डेविड ऑस्ट्रेलिया संघाचा भाग असेल. 20 ते 25 सप्टेंबरदरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचे निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी सांगितले की, “टी20 विश्वचषक 2021 विजेता ऑस्ट्रेलिया संघच आगामी विश्वचषकासाठी कायम आहे. हा संघ आता त्यांच्या घरच्या मैदानांवर टी20 विश्वचषक खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे.”
World Cup squad assembled!
Here's the 15 who will represent our national men's team at the upcoming T20 World Cup and tour of India 🇦🇺 pic.twitter.com/DUgqUGWuyV
— Cricket Australia (@CricketAus) August 31, 2022
आयपीएलमध्ये डेविडने घातलाय धुमाकूळ
डेविड त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना प्रभावी प्रदर्शन केले होते. 8 सामन्यांमध्ये 37.20 च्या सरासरीने फलंदाजी करताना त्याने 186 धावा फटकावल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाचा टी20 विश्वचषक संघ-
ऍरॉन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), ऍश्टन ऍगर, टीम डेविड, जोश हेजलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर, ऍडम झम्पा
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मुझसे शादी करोगी? हाँगकाँगच्या क्रिकेटरने भर स्टेडियममध्ये प्रेयसीला केले प्रपोज, उत्तर मिळालं…
भारताच्या विजयानंतर आमिरवर भडकले पाकिस्तानी फॅन्स; म्हणाले, “तू फिक्सर होतास आणि राहशील”
अखेर विराटचीच आघाडी! माजी कर्णधार कोहलीने मोडला कर्णधार रोहितचा विक्रम