येत्या काही महिन्यात टी20 विश्वचषक 2021 चा थरार रंगणार आहे. 17 ऑक्टोंबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत यूएई आणि ओमानमध्ये विश्वचषक सामने आयोजित केले गेले आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलिया डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एशेस मालिकेला सुरुवात होणीर आहे. या मालिकेसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज स्टिव्ह स्मिथ याने टी-20 विश्वचषकामधून बाहेर राहण्याची तयारी दाखविली आहे. त्याने कसोटी क्रिकेट खेळण्याला प्रथम प्राधान्य देण्याचे ठरवले आहे.
स्मिथला आयपीएल 2021 स्पर्धा सुरू असताना हाताच्या कोपराला दुखापत झाली होती. ती दुखापत अजूनही कमी झाली नाही. त्यामुळे त्याने वेस्ट इंडीज आणि बांगलादेश दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. त्याची दुखापत बरी होण्यासाठी त्याला अजून काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
शुक्रवारी क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूसोबत बोलताना स्मिथ म्हणाला की, “‘टी20 विश्वचषक सुरू होण्यासाठी अजून खूप वेळ आहे. मी आता सध्या ठीक आहे. परंतु मला झालेली दुखापत खूप हळूहळू बरी होत आहे. तरीदेखील मला आता बरे वाटत आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मला एशेस मालिकेपूर्वी पूर्णपणे फिट व्हायचे आहे. त्यासाठी मी टी20 विश्वचषक सोडण्यास तयार आहे. मला टी20 विश्वचषक स्पर्धा खेळायला आवडेल, परंतु कसोटी क्रिकेट हे माझे पहिले लक्ष्य आहे. माझे एकच लक्ष्य आहे की, ॲशेस मालिकेपूर्वी मी पूर्णपणे फिट व्हावे.”
चेंडू छेडछाड प्रकरणी स्मिथवर बंदी घालण्यात आली होती. बंदीचा कालावधी संपवून पुनरागमन केल्यानंतर स्मिथने मागील वर्षी खेळल्या गेलेल्या एशेज मालिकेमध्ये धुव्वादार फलंदाजी केली होती. त्याने चार सामन्यांत दोन दुहेरी शतकांसह 110.57 च्या फलंदाजीच्या सरासरीने 774 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
विक्रमतोड खेळीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मितालीचे ‘राज्य’, बनली महिला क्रिकेटची ‘मास्टर ब्लास्टर’
नाद करा पण आमचा कुठं! गोलंदाज झुलन गोस्वामीची विश्वविक्रमी कामगिरी, आजवर कोणालाही नाही जमली
भर सामन्यात बेशुद्ध पडल्या होत्या विंडिजच्या २ महिला क्रिकेटर, रुग्णालयातून आली मोठी अपडेट






