---Advertisement---

क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंड तरसतायेत एका कसोटी मालिका विजयासाठी! नजीकची कामगिरी लाज आणणारी

On: सोमवार, जानेवारी 17, 2022 7:37 AM
england gaba loss
---Advertisement---

इंग्लंड संघाने ऍशेस मालिका २०२१-२२ (ashes series 2021-22) मध्ये पराभव पत्करला आहे. ऍशेस मालिकेचा शेवटचा सामना होबार्टमध्ये पार पडला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला मात दिली आणि मालिका देखील  ४-० ने नावावर केली. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात १४६ धावांचा मोठा विजय मिळवला. इंग्लंडचे ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या ऍशेस मालिकेतील यापूर्वीचे प्रदर्शन पाहता, हा विजय अपेक्षित होता.

इंग्लंड संघ जेव्हा-जेव्हा ऑस्ट्रेलियात ऍशेस मालिका खेळला आहे, तेव्हा नेहमीच ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडवर वर्चस्व केल्याचे पाहायला मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाने यजमानपद भूषवलेल्या मागच्या १५ ऍशेस मालिकांचा विचार केला, तर यामध्ये इंग्लंडचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या मागच्या १५ ऍशेस मालिकांपैकी एकामध्येही इंग्लंड संघ विजयी ठरला नाही. या १५ मालिकांपैकी फक्त दोन मालिका इंग्लंड अनिर्णीत करू शकला आहे. यावर्षी देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाने मायदेशात खेळल्या गेलेल्या ऍशेस मालिकेत ४-० असा दिमाखदार विजय मिळवला.

व्हिडिओ पाहा- विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव

इंग्लंडचे अलिकडच्या काळातील कसोटी प्रदर्शन दिवसेंदिवस खराब होत असल्याचे दिसले आहे. इंग्लंडने मागच्या १० पेक्षा अधिक कसोटी सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला आहे.

इंग्लंडने खेळलेल्या मागच्या चार कसोटी मालिकांचा विचार केला, तर त्यापैकी तीन मालिका त्यांनी गमावल्या आहेत, तर एका मालिकेत संघ पिछाडीवर आहे. मागच्या चार मालिकांपैकी पहिल्या मालिकेत भारताकडून इंग्लंडला १-३ असा पराभव मिळाला होता. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंड संघ ०-१ ने पराभूत झाला. त्यानंतर मागच्या वर्षात मायदेशातील भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लंड १-२ अशा पिछाडीवर आहे. अशात आता सलग चौथ्या मालिकेत देखील इंग्लंडने चाहत्यांची नाराशा करत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करला.

दरम्यान, यावर्षीच्या ऍशेस मालिकेचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या तीन सामन्यात विजय मिळवून मालिका नावावर केली होती. त्यानंतर चौथा कसोटी सामना इंग्लंडने कसाबसा अनिर्णीत केला. मालिकेतील पाचव्या सामन्यात पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला धूळ चारली. ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅविस हेडने मालिकेत आणि शेवटच्या सामन्यात केलेल्या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर आणि मालिकावीर निवडले गेले. शेवटच्या सामन्यातील पहिल्या डावात हेडने १०१ धावा ठोकल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या –

Ashes Trophy| कांगारूंकडून साहेबांना शिकस्त! होबार्ट कसोटीसह ऍशेसवर ४-० ने कब्जा

‘कर्णधारपदावर कोणाचा जन्मसिद्ध अधिकार नाही’

श्रीलंका दौऱ्यात ‘आऊट ऑफ फॉर्म’ रहाणे, पुजाराची सुट्टी निश्चित! ‘हे’ तरुण शिलेदार घेऊ शकतात जागा

व्हिडिओ पाहा –

बेधडकपणे खेळणाऱ्या पंतबद्दल या गोष्टी नक्कीच माहित नसतील| Rishabh Pant Facts

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---