सध्या न्यूझीलंड क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दौऱ्यावरील पहिला वनडे सामना अपेक्षाप्रमाणे चांगलाच रंगतदार झाला. काहीशा कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अखेरपर्यंत हार न मानता न्यूझीलंडवर 2 गडी राखून निसटता विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन व यष्टीरक्षक ऍलेक्स केरी हे विजयाचे शिल्पकार ठरले. यासोबतच यजमान संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
What a match 🔥
From 44/5 at one point, Australia fight back to clinch the first ODI 👏
Watch #NZvAUS on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) 📺 #CWCSL | 📝 Scorecard: https://t.co/3yQv87W5Z1 pic.twitter.com/6S5CTqlDVk
— ICC (@ICC) September 6, 2022
केन्स येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय स्टार्कने गप्टिलला 6 धावांवर बाद करत योग्य ठरवला. मात्र, त्यानंतर कॉनवे, विल्यमसन व लॅथम यांनी अनुक्रमे 46, 45 व 43 धावा करत न्यूझीलंडला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. मात्र, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी शानदार कामगिरी करत न्यूझीलंडच्या लोवर मिडल ऑर्डरला जास्त धावा करू दिल्या नाहीत. 4 बाद 179 अशा सुस्थितीतून न्यूझीलंडचा डाव अखेरीस 232 पर्यंत मर्यादित राहिला. ऑस्ट्रेलियासाठी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 4 तर जोस हेजलवूडने 3 बळी मिळवले.
तुलनेने कमी धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. ट्रेंट बोल्ट व मॅट हेन्री यांनी अवघ्या 12 षटकात 44 धावांत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी पाठवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन डावाची जबाबदारी अष्टपैलू कॅमेरून ग्रीन व यष्टीरक्षक ऍलेक्स केरी यांनी घेतली. सुरुवातीला संयम दाखवल्यानंतर त्यांनी विरोधी गोलंदाजांवर आक्रमण करत 148 धावांची भागीदारी रचली. 99 चेंडूंमध्ये 85 धावा करून केरी बाद झाला. त्यानंतर मॅक्सवेल व स्टार्क फार काळ टिकले नाहीत. मात्र, ग्रीन याने अखेरपर्यंत नाबाद राहत 92 चेंडूवर 89 धावा करून संघाला दोन गडी राखून विजय मिळवून दिला. ग्रीन यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवले गेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी चार महिने अमेरिकेत प्रशिक्षण- रौप्य पदक विजेता अविनाश साबळे
हार्दिक पंड्या संघाचा पाचवा गोलंदाज बनू शकत नाही, दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
‘त्यामुळे’ पाकिस्तानने भारताला मात दिली! गोलंदाजी प्रशिक्षकांनी कमी केले अर्शदीपच्या खांद्यावरील ओझे