---Advertisement---

हार्दिक पंड्या संघाचा पाचवा गोलंदाज बनू शकत नाही, दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया

On: मंगळवार, सप्टेंबर 6, 2022 4:05 PM
Hardik-Pandya-2
---Advertisement---

आशिया चषकात सुपर फोरमधील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्ताकडून पराभव स्वीकारला. या सामन्यात भारतीय संघ चार गोलंदाजांसह उतरला होता आणि हार्दिक पंड्या याने पाचव्या अतिरिक्त गोलंदाजाची भूमिका पार पाडली. गोलंदाजीचे पर्याय कमी असल्यामुळे भारताला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, असे अनेकांना वाटते. अशातच भारताचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा यानेही संघात अजून एका गोलंदाजीची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.  

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) म्हणाला की, “हार्दिक पंड्या (Hardik Pandya) चांगली गोलंदाजी करत आहे, पण आपण त्याला पाचव्या गोलंदाजाच्या रूपात गृहीत धरू शकत नाही. मला वाटते की, प्रत्येक वेळी त्याच्याकडून चार षटकांची अपेक्षा ठेवणे योग्य नाहीये. आवेश खान आजारी असल्यामुळे आपल्याकडे पुरेसे पर्याय उपलब्ध नव्हते. भविष्यात भारतीय संघात काही बदल होऊ शकतात. हार्दिकने जर सहाव्या अतिरिक्त गोलंदाजाची भूमिका पार पाडली, तर चांगले होईल.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलाय टी-20 विश्वचषकाचा संघ, महत्वाच्या खेळाडूची कमी जाणवणार
‘भारत श्रीलंकेविरुद्ध हरणार आणि आशिया चषकातून बाहेर होणार’, पाकिस्तानी क्रिकेटरचे कटू बोल
निवृत्तीची फक्त औपचारिकता, ‘मि. आयपीएल’ रैनाची आयपीएल कारकीर्द तर तेव्हाच संपली होती!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---