ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्काॅटलंड यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात कांगारुंनी स्कॉटलंडचा 7 गडी राखून पराभव केला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना यजमान स्कॉटलंडने निर्धारित 20 षटकांत 154 धावा केल्या होत्या. परंतु ऑस्ट्रेलियन संघाने 62 चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य गाठले. ट्रॅव्हिस हेडने अवघ्या 25 चेंडूत 80 धावांची शानदार खेळी करत ऑस्ट्रेलियासाठी धावांचा जोरदार पाऊस पाडला. त्याच्यानंतर उरलेली पोकळीक कर्णधार मिचेल मार्शने भरून काढली. त्याने देखील 39 धावांची तुफानी खेळी खेळली.
सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत स्कॉटलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यजमान संघाकडून सर्वाधिक (28) धावा जॉर्ज मुनसेने केल्या. कर्णधार रिची बेरिंग्टनने 23 आणि मॅथ्यू क्रॉसने 27 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने जेक फ्रेझर मॅकगर्कची विकेट लवकर गमावली. त्यानंतर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडने चौकार आणि षटकार ठोकत संघाचा विजय सोपा केला. ऑस्ट्रेलियाने केवळ 58 चेंडूत 155 धावांचे लक्ष्य गाठले.
THE RECORD BREAKING POWERPLAY.
– Australia smashed 113/1 against Scotland – the highest powerplay score in T20i history. pic.twitter.com/4Tsbt0PMR2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 4, 2024
डावाच्या तिसऱ्या चेंडूवर जेक फ्रेझर मॅकगर्कची विकेट पडली. यानंतर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी संघाची कमान सांभाळली. या दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियाची धावसंख्या अवघ्या 6 षटकांत 113 धावांवर नेली. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील पॉवरप्लेमध्ये केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. मार्श पॉवरप्लेनंतर तो पुढच्याच चेंडूवर 39 धावांवर बाद झाला. औपचारिकपणे पाहिले तर मार्श आणि हेडच्या जोडीने 33 चेंडूत या 113 धावा केल्या आहेत.
ट्रॅव्हिस हेडने सामन्यात 17 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियासाठी टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याच्या बाबतीत तो आता मार्कस स्टॉइनिसच्या बरोबरीने पोहोचला आहे. हेडने 25 चेंडूत 80 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने 12 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार ठोकले. दुसरीकडे, मिचेल मार्शने आपल्या खेळीत केवळ 12 चेंडू खेळले. त्यापैकी 8 चेंडू सीमारेषेपर्यंत पोहचवत 5 चौकार आणि 3 षटकार मारल्या.
हेही वाचा-
दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीतून तीन खेळाडू बाहेर; BCCI ने केली बदलीची घोषणा
Paralympics 2024; क्लब थ्रोमध्ये भारताचा दुहेरी धमाका; एकाच स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यची कमाई
तिरंदाजीमध्ये देखील सुवर्णपदक; पॅरालिम्पिकमध्ये भारताला घवघवीत यश