दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघ यांच्यात 3 सामन्यांच्या टी20 मालिका सुरू आहे. यातला पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघाने जिंकल्यांनंतर, दुसरा सामना 1 सप्टेंबर रोजी डर्बन येथे खेळला गेला. हा सामनाही ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला. यासह ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेविरुद्धची टी20 मालिकाही जिंकली. त्यांच्याकडे आता मालिकेत 2-0 अशी आघाडी आहे. ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना 8 विकेटने सहज जिंकला. या सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा हिरो होता त्यांचा कर्णधार मिचेल मार्श, त्याने 79 धावांची तुफानी खेळी केली.
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेक ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंगकून कर्णधार मिचेल मार्श () ने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत 8 बाद 164 धावा करता आल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार एडन मार्करामने सर्वाधिक 49 धावा केल्या. त्याचवेळी टेंबा बावुमानेही 35 धावांची जलद खेळी केली. याशिवाय ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनांकडून सीन ऍबॉट आणि नॅथन एलिस यांनी 3-3 विकेट घेतल्या. त्याचबरोबर जेसन बेहरेनडॉर्फलाही 2 विकेट घेण्यात यश मिळाले. मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज डेवाल्ड ब्रेविस त्याच्या दुसऱ्या सामन्यातही फ्लॉप ठरला. त्याला खातेही उघडता आले नाही आणि पहिल्याच चेंडूवर तो नॅथन एलिसला बळी पडला.
165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का ट्रॅव्हिस हेडच्या रूपाने 32 धावांवर बसला. हेड 18 धावा करून बाद झाला. यानंतर संघाचा कर्णधार मिचेल मार्श फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर आला. मार्श आणि शॉर्टने मिळून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची अवस्था वाईट केली. दोघांमध्ये 100 धावांची भागीदारीही झाली. यानंतर शॉर्ट 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 66 धावा करून बाद झाला. या डावात त्याचा स्ट्राईक रेट 220 होता.
शॉर्टची विकेट पडल्यायनंतरही मार्श थांबला नाही आणि त्याने मोठे फटके खेळणे सुरूच ठेवले. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाने केवळ 14.5 षटकांत 165 धावांचे लक्ष्य गाठले. मार्शने 202 च्या स्ट्राईक रेटने 39 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 षटकार आणि 8 चौकारही ठोकले. त्याचा जोडीदार जोशुआ इंग्लिसने 2 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून लिजाद विल्यम्स आणि तबरेझ शम्सी यांना 1-1 यश मिळाले. (australia beat the south africa by 8 wickets in second 2nd t20 match)
महत्वाच्या बातम्या-
बड्डे बाॅय इशांत: ट्रोल तर कराच, पण कौतूकाची थापही जरूर द्या!
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 15: लांब केसांमुळे अक्षरश: दंड भरायला तयार होणारा इशांत शर्मा