---Advertisement---

या कारणामुळे शेन वॉर्न ‘बुशफायर क्रिकेट बॅश’ या सामन्यामधून पडला बाहेर….

On: शनिवार, फेब्रुवारी 8, 2020 11:36 AM
---Advertisement---

मागील काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियामधील जंगलामध्ये आग (Australia Fire) लागली होती. यामध्ये 50 कोटींची जीवितहानी झाली होती. त्यामुळे या आगीत नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी अनेक प्रकारे मदतीची हाक येत आहे. त्यामध्ये चॅरिटी क्रिकेट (Charity Cricket) सामन्याचाही समावेश आहे.

ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीत नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी घेण्यात येणाऱ्या बुशफायर क्रिकेट बॅश या चॅरिटी सामन्याची तारीख आणि स्थान बदलण्यात आली आहे. सिडनीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे आज (8 फेब्रुवारी) सिडनी येथे वॉर्न एकादश विरुद्ध पाँटिंग एकादश संघात होणारा हा सामना आता सोमवारी (10 फेब्रुवारी) मेलबर्न येथे पार पडणार आहे.

या सामन्याची तारीख बदलल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार शेन वॉर्न (Shane Warne) या सामन्यातून बाहेर पडला आहे. 10 फेब्रुवारीला त्याला काही वैयक्तिक काम असल्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही.

त्याचा बदली कर्णधार म्हणून ऍडम गिलक्रिस्ट वॉर्न एकादश  संघाचे नेतृत्व करणार आहे. परंतु पाँटिंग एकादश संघाचा कर्णधार रिकी पाँटिंगच (Ricky Ponting) असणार आहे.

बुधवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे.

या सामन्याला बुशफायर क्रिकेट बॅश नाव देण्यात आले आहे. यामध्ये पाँटिंग एकादश या संघाचा मुख्य प्रशिक्षक भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे. तसेच वॉर्न-11 या संघाचा मुख्य प्रशिक्षक विंडीजचा माजी वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्श (Courtney Walsh) आहे.

हा सामना 10-10 षटकांचा असेल. ज्यामध्ये 5 षटकांचा पावरप्ले असेल. या सामन्यात ब्रायन लारा, युवराज सिंग, वसीम अक्रम, जस्टीन लँगर, मॅथ्यू हेडन, शेन वॉट्सन, अँड्र्यू सायमंड, ब्रॅड हॅडिन आणि ब्रेट ली खेळेल.

दक्षिण-पूर्व ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या या आगीत जवळपास 60 हजार किमीच्या क्षेत्रफळात असणारी झाडे जळून खाक झाली आहेत. तसेच 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 5 हजार घरे नष्ट झाली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---