ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केर्न्स येथे खेळला गेला. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 22 धावांनी पराभूत करत 3-0 अशा फरकाने मालिका खिशात घातली. याचसोबत ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंच याच्या वनडे कारकिर्दीची विजयी अखेर झाली. शानदार शतकी खेळी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला सामनावीर आणि मालिकावीर अशा दोन्ही पुरस्कारांनी गौरविले गेले.
Australia complete a 3-0 clean sweep 👏#CWCSL | Scorecard: https://t.co/MMqsSFc5GP pic.twitter.com/0XlRvtznnP
— ICC (@ICC) September 11, 2022
केर्न्स येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच केवळ 5 धावांवर बाद झाल्यानंतर चाहते नाराज होते. मात्र, त्यानंतर संपूर्ण डावात स्मिथने वर्चस्व गाजवत 131 चेंडूत 105 धावांची विशेष खेळी केली. यावेळी त्याने 1 षटकार आणि 11 चौकार लगावले. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील 12 वे शतक ठरले. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 5 बाद 267 धावा केल्या. स्मिथच्या 105 धावांसह मार्नस लाबुशेनने 52 धावांची खेळी केली. ऍलेक्स केरी याने 42 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्टने 2 बळी मिळवले.
प्रत्युत्तरात, फिन ऍलन व डेवॉन कॉनवे यांनी संघाला 49 धावांची सलामी दिली. मात्र, ते मोठ्या धावसंख्या करू शकले नाहीत. कर्णधार केन विलियम्सन हादेखील 27 धावा करू शकला. खालच्या फळीत ग्लेन फिलिप्स (47), जिमी निशाम (36) व मिचेल सॅंटनर (30) चांगल्या सुरुवातीनंतर संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. त्यांचा संपूर्ण संघ एक चेंडू शिल्लक असताना 242 धावांवर सर्वबाद झाला. यासह ऑस्ट्रेलियाने 25 धावांनी विजय आपल्या नावे केला. ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्कने तीन तर, अबॉट व ग्रीनने प्रत्येकी दोन बळी मिळवले. यानंतर ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर टी20 मालिका खेळेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकात का शांत आहे बाबर आझमची बॅट? खुद्द प्रशिक्षकांनीच सांगितलेय कारण
ASIA CUP: सामना सुरू होण्यापूर्वीच जवळपास निश्चित होणार आशिया चषकाचा विजेता, वाचा कसं काय
आशिया चषकातील खराब कामगिरीनंतर जॉन्टी रोड्सचा भारतीय संघाला विशेष सल्ला! म्हणाला…