कोरोना व्हायरसमुळे जवळपास सर्वच क्रिकेट बोर्डांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता याची भरपाई करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया वर्षाच्या शेवटी भारताविरुद्ध होणाऱ्या ४ सामन्यांची कसोटी मालिकेला ५ सामन्यांमध्ये बदलण्याचा विचार करत आहे.
येत्या ऑक्टोबरमध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा टी२० तिरंगी मालिकेने सुरु होणार आहे. तसेच डिसेंबरमध्ये ४ सामन्यांची कसोटी मालिका (4 Matches Test Series) संपणार आहे. या दरम्यान टी२० विश्वचषकही आहे. जो १८ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य आधिकारी (CEO) केविन रॉबर्ट्स (Kevin Roberts) यांंनी एएपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या प्रभावाबद्दल बोलायचे झाले तर, आमचे लाखो डॉलर्सचे नुकसान झाले आहे. आम्ही याच्या भरपाईसाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत. तसेच अनेक पर्यायांवरही विचार करत आहे.”
केविन पुढे म्हणाले की, “आमच्याकडे सध्या वेळ आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान वेगवेगळ्या पर्यायांवर विचार केला जात आहे. सध्या आम्ही कोणतीही शक्यता नाकारत नाही.”
प्रेक्षकांशिवाय टी२० विश्वचषकाचे आयोजन करण्याचा विचार केला जात आहे. याबद्दल बोलताना केविन म्हणाल की, “कदाचित यामुळे आर्थिक फायदा होणार नाही. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी हे महत्त्वाचे आहे. यावेळी प्रसारण अधिकारांमधून मिळणारी रक्कम आयसीसी आणि संपूर्ण क्रिकेट जगतासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही टी२० विश्वचषकाचे (T20 World Cup) आयोजन करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत.”
कोरोना व्हायरसमुळे अनेक क्रीडास्पर्धा ठप्प झाल्या आहेत. ३० जूनला संपणाऱ्या आर्थिक वर्षातील उर्वरित भागासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) आपल्या कर्मचार्यांपैकी ८० टक्के कर्मचार्यांना सुट्टी दिली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?






