---Advertisement---

तर भारतात होऊ शकतो टी२० विश्वचषक…

On: बुधवार, एप्रिल 22, 2020 11:11 AM
---Advertisement---

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण क्रीडा जगताबरोबरच क्रिकेटच्या स्पर्धादेखील ठप्प होताना दिसत आहेत. या व्हायरसमुळे देशातील सर्वात मोठी टी२० लीग आयपीएलही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

अशामध्ये आता सर्वांचे लक्ष लागून असलेला वर्षातील टी२० विश्वचषकदेखील या व्हायरसच्या कचाट्यात सापडताना दिसत आहे. यावेळी भारतीय संघाचे माजी फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांंनी टी२० विश्वचषकाच्या आयोजनावर एक अनोखा सल्ला (Advice) दिला आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत गावसकर म्हणाले की, “जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे, ऑस्ट्रेलियाने ६ महिन्यांसाठी म्हणजेच ३० डिसेंबरपर्यंत देशाच्या सीमा बंद केल्या आहेत. अशामध्ये टी२० विश्वचषक ऑक्टोबर महिन्याच्या मध्ये सुरु होणार असला तरी, याचे आयोजन करणे कठीण दिसत आहे.”

गावसकर पुढे म्हणाले की, “पुढील वर्षी टी२० विश्वचषक भारतात होणार आहे. जर भारत (India) आणि ऑस्ट्रेलियामध्ये करार झाला, तर भारतातील कोविड-१९ या व्हायरसची (Covid-19 Virus) वाढती प्रकरणे कमी झाल्यानंतर ते स्पर्धांमध्ये अदला बदल करू शकतात. २०२०चा विश्वचषक भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकतो. तसेच २०२१चा विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) जवळपास याच महिन्यांमध्ये होऊ शकतो.”

आयपीएलही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. परंतु याचे आयोजन सप्टेंबरमध्ये करण्याची शक्यता आहे.

याबद्दल बोलताना गावस्कर म्हणाले की, “जर आयपीएल सप्टेंबरमध्ये झाले, तर टी२० विश्वचषकापूर्वी आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते. ज्यामुळे खेळाडूंना सरावासाठी पुरेसा वेळ मिळेल. यानंतर तुम्ही नोव्हेंबरमध्ये टी२० विश्वचषकाचे आणि डिसेंबरमध्ये यूएईमध्ये आशिया चषकाचे आयोजन केले जाऊ शकते. यूएईमध्ये स्पर्धेचे यजमानपद सांभाळण्यासाठी डिसेंबर हा चांगला वेळ आहे.”

ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू टी२० विश्वचषक (T20 World Cup) स्थगित करण्याबाबत म्हटले आहेत. खरंतर ऑस्ट्रेलियामधील लॉकडाऊन संपल्यानंतरही ऑस्ट्रेलिया सरकार लगेच प्रेक्षकांच्या उपस्थितीत विश्वचषकाचे आयोजन करण्याची परवानगी देणार नाही. तसेच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना असे वाटते की, जर टी२० विश्वचषक प्रेक्षकांशिवाय होणार असेल तर ते स्थगित केले पाहिजे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-टीम इंडियाच्या शिलेदारांची तयार झाली ‘टीम मास्क फोर्स’

-भारतीयांत फक्त जसप्रीत बुमराहला स्थान मिळालेल्या ड्रीम ११मध्ये बाकी खेळाडू आहेत तरी कोण

-लाॅकडाऊनमध्ये झिवाला घेऊन धोनीची बाईक राईड, व्हिडीओ होतोय व्हायरल 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---