---Advertisement---

“फलंदाज नव्हे गोलंदाजांमूळे हरतोय’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने लावला वेगळाच तर्क

---Advertisement---

रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 मध्ये चांगले प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियावर आघाडी घेतली. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारत 2-0 अशा आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत पिछाडीवर पडला असताना, आता ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांनी या पराभवासाठी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना दोष दिला आहे. 

ऑस्ट्रेलियन संघ मोठ्या कालावधीनंतर भारतात मालिका विजय मिळवण्याच्या इराद्याने या मालिकेत सहभागी झाला होता. अनेक माजी क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलियालाच या मालिकेत विजयाची संधी असल्याचे म्हटलेले. मात्र, प्रत्यक्ष सामन्यावेळी ऑस्ट्रेलियन संघ भारतापेक्षा दुबळा दिसून आला. भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाच्या सर्वच फलंदाजांनी अक्षरशः नाग्या टाकल्या. नागपूर व दिल्ली येथे झालेल्या पहिल्या दोन्ही कसोटी भारतीय संघाने तीन दिवसात जिंकत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यात अपयशी आले.

ऑस्ट्रेलिया संघाच्या या खराब कामगिरीनंतर बोलताना ग्रेग चॅपेल म्हणाले,

“ऑस्ट्रेलियन संघाने परिस्थिती पाहून अधिक फिरकीपटूंना संधी दिली. मात्र, ऑस्ट्रेलियाची ताकद ही वेगवान गोलंदाजी आहे. त्यामुळे संघाने आपल्या सर्वोत्तम गोलंदाजांसह मैदानात उतरायला हवे होते. त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. त्यानंतर फलंदाजांची जबाबदारी आहे की त्यांनी संघाला मोठी धावसंख्या उभारून द्यावी.”

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना आता इंदोर येथे एक मार्चपासून खेळला जाईल. हा सामना जिंकून पुनरागमन करण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलिया संघाचा असेल. नियमित कर्णधार पॅट कमिन्स मायदेशी परतला असल्याने, अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ संघाचे नेतृत्व करेल. त्या व्यतिरिक्त सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा देखील मालिकेतून बाहेर झाला आहे.

(Australia Former Captain Greg Chappell Blame Australia Bowlers For Defeats In Nagpur And Delhi Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीएवढे कसोटी षटकार माराणारा न्यूझीलंडचा गोलंदाज! इंग्लंडविरुद्ध खेळताना नावावर केला नवा विक्रम
‘धोनी माझा फोन 99% उचलणारच नाही’, विराटचा मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---