इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली याने अनेक खुलासे केले आहेत, ज्याबद्दल क्वचितच चाहत्यांना माहिती असेल. यादरम्यान त्याने चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी याच्याबाबत अनेक गोष्टींचा उल्लेख केला. खरं तर, विराटची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये होते. त्याने त्याचे पदार्पण धोनीच्या नेतृत्वाखाली केला आहे. अनेकदा विराटच्या वक्तव्यामध्ये धोनीचा उल्लेख होतो. यादरम्यान त्याने असेही म्हटले की, त्याने फोन केल्यानंतर धोनी फोन न उचलण्याची 99टक्के शक्यता असते.
‘धोनी उचलत नाही फोन’
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या पॉडकास्टमध्ये (RCB Podcast) विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला की, “खराब काळात अनुष्का शर्मा, कुटुंब, बालपणीच्या मित्रांव्यतिरिक्त एमएस धोनी याने माझी साथ दिली.” पुढे बोलताना तो म्हणाला, “एमएस धोनीला ओळखणे ही नशिबाची गोष्ट आहे. कारण, कुणीतरी तुमच्यापेक्षा इतका अनुभवी आहे आणि तुम्हाला त्याच्याकडून शिकण्यास मिळत आहे. आम्ही एकमेकांचा सन्मान करतो. धोनीशी संपर्क साधणे खूपच कठीण आहे. जर मी त्यांना फोन केला, तर त्यांनी फोन न उचलण्याची 99 टक्के शक्यता असते. ते त्यांचा फोनच पाहत नाहीत.”
पुढे बोलताना त्याने सांगितले की, “धोनीने मला आजपर्यंत फक्त दोन वेळा मेसेज केला आहे. एकदा त्यांनी लिहिले की, जेव्हा लोक तुम्हाला मजबूत स्थितीत पाहतात, तेव्हा हे विचारणे विसरून जातात की, तुम्ही कसे आहात.” तो पुढे म्हणाला की, “मला धोनीशी बोलून चांगले वाटले. त्यांनी मला आठवण करून दिली की, मी कोण आहे. धोनीला ही गोष्ट माहिती आहे. कारण, तेदेखील या काळातून गेले आहेत.”
विराट कोहली आणि एमएस धोनी (Virat Kohli And MS Dhoni) यांनी 2008 ते 2019दरम्यान एकूण 285 सामने एकत्र खेळले आहेत. त्यात 30 कसोटी, 195 वनडे आणि 60 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांचा समावेश आहे. (indian cricketer virat kohli praises ms dhonis support)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सर्व बाजूंनी टीका होत असताना हरमनप्रीतला मिळाला अनुष्काचा पाठिंबा; म्हणाली, ‘तुझा आणि तुझ्या संघाचा…’
शेन वॉर्नचा कसोटी रेकॉर्ड तोडण्यासाठी अँडरसन सज्ज! हव्या आहेत फक्त ‘एवढ्या’ विकेट्स