Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘रोहित टीव्हीवर लठ्ठ दिसतो, त्याने…’, विश्वविजेत्या कर्णधाराने सुनावले खडेबोल

'रोहित टीव्हीवर लठ्ठ दिसतो, त्याने...', विश्वविजेत्या कर्णधाराने सुनावले खडेबोल

February 23, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
MI vs CSK (MS Dhoni and Rohit Sharma)

Photo Courtesy:iplt20.com


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा () त्याच्या दर्जेदार शॉट्ससाठी जगभारात ओळखला जातो. पण फिटनेसवरून अनेकदा त्याच्यावर टीका देखील होत आली आहे. रोहित शर्माची आकडेवारी आणि प्रदर्शन भारतीय संघासाठी जबरदस्त राहिले आहे. पण संघातील इतर खेळाडूंच्या तुलनेत रोहित दिसताना अधिक लठ्ठ वाटतो, असे भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांना वाटते. कपिलने रोहितला स्वतःच्या फिटनेसवर काम करण्याचा सल्ला दिली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर गावसरकर ट्रॉफी (BGT 2023) सध्या खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने अप्रतिम खेळ दाखवून 2-0 अशी बरोबरी साधली आहे. रोहित शर्मा याने पहिल्या दोन सामन्यांतील तीन डावांमध्ये 183 धावा केल्या. यात रोहितच्या एका शतकाचाही समावेश आहे. कर्णधाराच्या रूपात रोहितने घेतलेले काही निर्णय संघासाठी चांगलेच फायद्याचे ठरले. बॉर्डर गावसरकर ट्रॉफी 2023मध्ये रोहितचे आतापर्यंतचे प्रदर्शन पाहून कर्णधार कपिल देव यांनीही कौतुक केले. पण भारताच्या या विश्वविजेत्या कर्णधाराने रोहितच्या फिटनेसविषयी चिंता देखील बोलून दाखवली. कपिल देव (Kapil Dev) यांच्या मते रोहित टीव्हीवर जास्त जाड दिसतो.

कपिल देवच्या मते रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताचा महान खेळाडू आहे. पण विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे पाहिल्यानंतर रोहितची फिटनेस कमी वाटते. माध्यमांसमोर कपिल देव म्हणाले की, “मी जे पाहत आहे, त्यावरून म्हणेल रोहित एक महान खेळाडू आणि महान कर्णधार आहे. पण त्याला अजून फिट होण्याची गरज आहे. विराटकडे जेव्हाही आपण पाहतो, तेव्हा काय फिटनेस आहे, असे म्हणतो. कर्णधार असल्यामुळे फिटनेस अधिक महत्वाची असते. रोहितलाही यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल.”

दरम्यान, उभय संघांतील या बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. दिल्लीत पार पडलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ 6 विकेट्सने पराभूत झाला. उभय संघांतील तिसरा कसोटी सामना 1 मार्च रोजी इंदोरच्या होळकर स्टेडियमवर सुरू होईल. मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना 9 ते 13 मार्चदरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. (‘Rohit looks fat on TV…’, world champion captain Kapil Dev said harshly)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतचा पत्ता कट करत दिल्लीने ‘या’ खेळाडूकडे सोपवले कर्णधारपद? पठ्ठ्याने एका टीमला बनवलंय चॅम्पियन
हैदराबादचा नवा कर्णधार आहे तरी कोण? नतृत्व करताना संघाला बनवलंय दोन वेळा चॅम्पियन


Next Post
Shikhar-Dhawan-And-Huma-Qureshi

'म्हणूनच बायको सोडून गेली', धवन अन् बॉलिवूड अभिनेत्रीच्या 'त्या' व्हिडिओवर नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट

Photo Courtesy: Twitter/BCCI

"सिराजला गोलंदाजीतील विराट व्हायचेय", माजी प्रशिक्षकांनी सांगितला तो किस्सा

IPL-Teams-Captain

आयपीएल इतिहासात 'या' संघावर आली 14 वेळा कर्णधार बदलण्याची वेळ; पाहा सर्व संघ अन् त्यांच्या कॅप्टन्सची यादी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143