ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान (Australia vs Pakistan) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले. या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना 29 धावांनी तर दुसरा सामना 13 धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिका आपल्या खिशात घातली.
दुसरा टी20 सामना (16 नोव्हेंबर) रोजी खेळला गेला. हा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर रंगला होता. पहिला टी20 सामना जिंकल्यानंतर दुसरा टी20 सामनाही जिंकण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. यासोबतच ही मालिकाही जिंकण्यात संघ यशस्वी ठरला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वनडे मालिकेतील पराभवाचा बदलाही घेतला आहे. आता शेवटचा टी20 सामना (18 नोव्हेंबर) रोजी निंजा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
दुसऱ्या टी20 सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर जॅक फ्रेझर मॅकगर्क (Jake Fraser McGurk) आणि मॅथ्यू शॉर्ट (Matthew Short) यांनी पाकिस्तानी गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला आणि अवघ्या 19 चेंडूत 52 धावा जोडल्या. शॉर्टने 17 चेंडूत 32 धावा केल्या. दरम्यान त्याने 2 चौकारांसह 2 उत्तुंग षटकार ठोकले. तर जॅक फ्रेझर मॅकगर्कने 9 चेंडूत 20 धावा ठोकल्या. त्याच्या खेळीत त्याने 3 चौकारांसह 1 षटकार ठोकला.
त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) 21, मार्कस स्टाॅयनिस (Marcus Stoinis) 18 धावा, आरोन हार्डी (Aaron Hardie) 28 धावा या खेळाडूंच्या जोरावर ऑस्ट्रेलिया मर्यादित 20 षटकात 9 गडी गमावून 147 धावा केल्या.
पाकिस्तानसाठी हारिस रौफने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन दाखवत 22 धावात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतर अब्बास आफ्रिदीने (Abbas Afridi) ऑस्ट्रेलियाच्या 3 खेळाडूंना तंबूत पाठवले. सुफियान मुकीमने 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
148 धावांचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाची अवस्था खूपच खराब झाली. बाबर आझम (Babar Azam) केवळ 3 धावा करून बाद झाला. साहिबजादा फरहान 5 धावा करून आणि कर्णधार मोहम्मद रिझवान (Mohammed Rizwan) 16 धावा करून तंबूत परतला.
उस्मान खान (Usman Khan) आणि इरफान खान (Irfan Khan) यांनी मधल्या फळीत संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. उस्मानने 38 चेंडूत 52 धावा केल्या, पण त्याची विकेट गेल्यानंतर पाकिस्तानच्या जिंकण्याच्या आशा स्थगित झाल्या. ऑस्ट्रेलियन स्पेन्सर जॉन्सनने चमकदार कामगिरी करत शेवटच्या षटकात घेतलेल्या 2 विकेटसह 5 विकेट्स आपल्या नावावर केल्या. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 134 धावांत आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सामन्यात 13 धावांनी शानदार विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीसाठी ऑस्ट्रेलियाला कधी रवाना होणार रोहित शर्मा?
मेगा लिलावासाठी आरसीबीच्या सर्व योजना तयार! प्रशिक्षक बनवणार मजबूत संघ
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी माजी ऑस्ट्रेलिया दिग्गजाचा गौतम गंभीरवर शाब्दिक हल्ला!