ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील 24व्या सामन्यात आमने-सामने आहेत. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर रंगणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होत आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली असून ही नाणेफेक ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्याद्वारे ऑस्ट्रेलिया विजयाची हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करेल.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघात एक बदल झाला आहे. मार्कस स्टॉयनिस हा संघाबाहेर झाला असून त्याच्या जागी कॅमरून ग्रीन याला जागा मिळाली आहे. दुसरीकडे, नेदरलँड्स संघात कोणताही बदल झाला नाहीये.
स्पर्धेतील कामगिरी
विश्वचषक 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. त्यात त्यांना पहिल्या दोन सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी दोन्ही सामने जिंकले. दुसरीकडे, नेदरलँड्स संघाला 4 सामन्यांपैकी 3 पराभव पत्करावे लागले आहेत.
ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या सामन्यात भारताविरुद्ध 6 विकेट्सने, दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 134 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट्सने आणि पाकिस्तानविरुद्ध 62 धावांनी विजय मिळवला होता. याव्यतिरिक्त नेदरलँड्स संघाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 81 धावांनी, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 99 धावांनी नमवले होते. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला 38 धावांनी पराभूत केले होते. मात्र, पुन्हा चौथ्या सामन्यात श्रीलंकेकडून 5 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. (Australia have won the toss and have opted to bat against netherlands)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया
डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, ऍडम झम्पा
नेदरलँड्स
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/यष्टीरक्षक), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, तेजा निदिमानुरु, बास डी लीड, कॉलिन एकरमन, सीब्रँड एंजेलब्रेच, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, पॉल व्हॅन मीकेरेन, आर्यन दत्त
हेही वाचा-
‘दररोज 8 किलो मटण खातायेत…’, पाकिस्तानी खेळाडूच्या फिटनेसवर खवळला Wasim Akram, ‘असा’ काढला राग
विश्वचषकाच्या मध्येच बोर्डाने केली Central Contractची घोषणा, दिग्गज खेळाडूबाबत घेतला हैराण करणारा निर्णय