---Advertisement---

राजकोट वनडेसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया, पंत ऐवजी या खेळाडूला मिळाली संधी

On: शुक्रवार, जानेवारी 17, 2020 1:18 PM
---Advertisement---

राजकोट। आज(17 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा वनडे सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट येथे होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताने अंतिम 11 जणांच्या संघात 2 बदल केले आहेत. यामध्ये दुखापतग्रस्त रिषभ पंत ऐवजी मनिष पांडेला संधी मिळाली आहे. तर शार्दुल ठाकूर ऐवजी नवदीप सैनीचा 11 जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर रिषभ या सामन्यात खेळणार नसल्याने केएल राहुल यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल.

https://twitter.com/BCCI/status/1218074304555798528

तसेच ऑस्ट्रेलियाने त्यांच्या अंतिम 11 जणांच्या संघात एकही बदल केलेला नाही. त्यामुळे मुंबईत पहिल्या वनडेत खेळलेले ऑस्ट्रेलियाचे 11 खेळाडू या सामन्यातही खेळणार आहेत.

हा सामना भारतासाठी करो या मरोचा सामना असणार आहे. कारण या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया 1-0 ने या मालिकेत आघाडीवर आहे.

याचमुळे भारत आज सामन्यात विजय मिळवून मालिकेतील आव्हान कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. पण त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा आज सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न असेल.

असे आहेत 11 जणांचे संघ – 

भारत – रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलिया – डेव्हिड वॉर्नर, ऍरोन फिंच (कर्णधार), मार्नस लॅब्यूशान, स्टीव्हन स्मिथ, ऍश्टन टर्नर, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), ऍश्टन एगर, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झम्पा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---