---Advertisement---

ऑस्ट्रेलियाने १५ वर्षांनंतर केली इतिहासाची पुनरावृत्ती, श्रीलंकेवर केली १० गडी राखत मात

On: बुधवार, जून 8, 2022 1:06 PM
Sri-Lanka-VS-Australia
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या टी२० मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. या ३ टी२० सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर ७ जून रोजी खेळला गेला. या सामन्यांत ऑस्ट्रेलियाच्या संघाने श्रीलंकेवर १० गडी राखत मात केली. ऑस्ट्रेलिया संघाने हा सामना जिंकत एका विक्रमाची नोंद केली आहे. ऑस्ट्रेलियाने १५ वर्षांनंतर श्रीलंकेवर टी२० मध्ये १० विकेट्सनी मात केली. शेवटच्या वेळी त्याने २००७ मध्ये असे केले होते. त्यावेळी पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेतील न्यूलँड्स येथे दोन्ही संघांमध्ये टी२० सामना खेळला गेला होता.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने (Sri Lanka) १९.३ षटकात १२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने (Australia) १४ षटकांत बिनबाद १३४ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघाच्या विजयाचे हिरो होते वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (Josh Hazelwood), सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि कर्णधार ऍरोन फिंच (Aaron Finch). हेझलवूडने गोलंदाजीत कमाल केली. त्याने चार षटकात १६ धावा देत ४ बळी घेतले. त्याचवेळी वॉर्नरने नाबाद ७० आणि फिंचने नाबाद ६१ धावा केल्या. वॉर्नरने ४४ चेंडूंच्या खेळीत ९ चौकार लगावले. तर, फिंचने ४० चेंडूंच्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकार लगावले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कांगारूंचा कर्णधार ऍरॉन फिंचचा हा निर्णय योग्य ठरला. जोश हेझलवूडने दनुष्का गुणातिलकाला २६ धावांवर बाद करून श्रीलंकेला पहिला धक्का दिला. गुणातिलकाने पथुम निसांकासोबत पहिल्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. निसांकाने चरिथ असलंकासोबत दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. निसांका ३१ चेंडूत ३६ धावा करून बाद झाला. १०० धावांवर दोन विकेट गमावल्यानंतर श्रीलंकेचा डाव गडगडला. अखेरच्या आठ विकेट्स २८ धावांत पडल्या. असालंकाने ३४ चेंडूत ३८ धावा केल्या. त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याच्यापाठोपाठ वानिंदू हसरंगाने १५ चेंडूत १७ धावा केल्या. कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे आणि दासुन शनाकाने मधल्या फळीत अपयशी ठरले. खालच्या क्रमवारीत करुणारत्ने, चमीरा आणि महेश टीक्षाना प्रत्येकी एक धावांवर बाद झाले. त्यामुळे डावाअखेरीस श्रीलंका १९.३ षटकांत १२८ धावांवर सर्वबाद झाले.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘…म्हणून रोहित शर्मा उत्कृष्ट कर्णधार,’ बेबी एबीने गायले हिटमॅनचे गोडवे

‘हिटमॅनबाबत घेतलेला तो निर्णय बरोबरच’, प्रशिक्षक राहुल द्रविडचा रोहितला पाठींबा

हार्दिक म्हणतोय, ‘वासिम जाफर आवडता खेळाडू’; कारणही सांगितलंय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---