---Advertisement---

‘त्या’ निर्णयामुळे ऑस्ट्रेलियाचं कसोटी चॅम्पियनशीपचं स्वप्न चक्काचूर; भारताला मिळालं फायनलचं तिकीट?

On: बुधवार, मार्च 3, 2021 11:49 AM
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने मागील काही महिन्यांपासून कसोटी मालिका खेळवल्या जात आहेत. न्यूझीलंड संघाने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आधीच प्रवेश केला आहे. तसेच भारताने अहमदाबाद येथे इंग्लंडविरुद्ध झालेला तिसरा कसोटी सामना जिंकत इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. दुसरीकडे अंतिम फेरीसाठी भारताचा प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलिया संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकामुळे त्यांचे कसोटी अजिंक्यपद जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळू शकते.

भारताने अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १० विकेट्सने इंग्लंडला पराभूत केले आहे. या पराभवासह इंग्लंडचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र जर इंग्लंडने दिनांक ४ मार्चपासून होणारा चौथा कसोटी सामना जिंकल्यास ऑस्ट्रेलिया आपोआप अंतिम फेरीचा दावेदार ठरेल. परंतु दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने क्रिकेट ऑस्ट्रेलिया विरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलला (आयसीसी) अधिकृत तक्रार केल्याने त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करता येणार नसल्याचे समजत आहे.

सिडनी मॉर्निंग हेराल्डमधील वृत्तानुसार, यावर्षाच्या सुरुवातीला कोरोनामुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकाविरुद्धची ३ सामन्यांची कसोटी मालिका स्थगित केली होती. यानंतर दक्षिण आफ्रिका बोर्डाने आयसीसीकडे त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकाच्या आर्थिक नुकसानाची भरपाई करावी आणि त्यांचे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुण कमी करण्यात यावेत, अशी मागणी दक्षिण आफ्रिकाने आयसीसीकडे केली आहे.

अशात जर आयसीसीने दक्षिण आफ्रिका बोर्डाच्या मागणीची दखल घेत ऑस्ट्रलियाचे गुण कमी केले; तर त्यांचे अंतिम फेरीतील आव्हान संपुष्टात येईल. परिणामत: इंग्लंडने चौथ्या कसोटीत भारताला पराभूत केले, तरीही भारत अंतिम फेरीत धडक मारेल. असे असले तरीही, आयसीसीने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या आठवड्याखेर वेळ दिला आहे, जेणेकरून सद्भावतेने हे प्रकरण सोडवता येईल.

जर हे प्रकरण अशाप्रकारे सुटले नाही, तर आयसीसीच्या वाद समितीकडे हे प्रकरण पाठवण्यात येईल. त्यानंतर एका स्वतंत्र्य पॅनेलच्या हाती हे प्रकरण सोपवण्यात येईल. मग त्यांच्याद्वारे निर्णय घेतला जाईल की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मालिका स्थगित करण्याचा निर्णय योग्य होता का नाही? किंवा ऑस्ट्रेलियाला त्यांचे १२० गुण द्यायचे का नाही?

महत्त्वाच्या बातम्या-

मानलं तुम्हाला भावांनो! टी२० मालिकेसाठी ‘या’ भारतीय खेळाडूंनी कारने केला ६७८ किमीचा प्रवास

इंग्लंडमुळे होणार टीम इंडियाचा स्वप्नभंग? टेस्ट चॅम्पियशीपमध्ये सर्वात यशस्वी संघ बनण्याची सुवर्णसंधी

चौथ्या कसोटीत एक शतक अन् ‘हा’ विश्वविक्रम होणार विराट कोहलीच्या नावे, वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---