---Advertisement---

क्या सोचा था, क्या हो गया..! रिव्ह्यू चुकल्यानंतर ऑसींनी धरलं डोकं, पाहा तो मजेदार क्षण

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 9:39 AM
---Advertisement---

ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा आज (१९ जानेवारी) अखेरचा दिवस आहे. या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघाला रोहित शर्माच्या रुपात मोठा धक्का बसला. परंतु युवा सलामीवीर शुबमन गिल आणि कसोटीपटू चेतेश्वर पुजारा यांनी मिळून भारताचा डाव सावरला. दरम्यान ऑस्ट्रेलियाने एक रिव्हयू घेतला आणि आपला रिव्ह्यू चुकीचा ठरल्याचे पाहून त्यांनी दिलेला मजेशीर प्रतिसाद कॅमेरात कैद झाला आहे.

झाले असे की, गिल आणि पुजारा मिळून डावास चालना देत होते. अशात डावातील १८ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायन याच्या षटकातील शेवटचा चेंडू पुजाराच्या पायावरील पॅडवर लागला. हे पाहून ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना पुजारा पायचित झाल्याचे वाटले. परंतु पंचांनी यावर कसलाही प्रतिसाद न दिल्याने कर्णधार टिम पेनने रिव्ह्यू घेतला.

यावेळी क्रिजवर पुजारा आणि गिल एकमेकांच्या जवळ उभारुन तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट पाहात होते. त्यांच्या मागे कर्णधार टीम पेन आणि लायन यांच्यासह इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूही आपला रिव्ह्यू वाया न जाता पुजारा बाद असेल, या अपेक्षेने एकत्र उभारले होते. परंतु तिसऱ्या पंचांनी पूर्ण पडताळणीनंतर पुजारा नाबाद असल्याचे जाहीर केले. हे पाहून, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी हताश होत डोके धरले.

यावेळचा त्यांचा तो क्षण कॅमेरात कैद झाला. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध ७ क्रिकेट या चॅनलने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी लिहिले आहे की, “या क्षणासाठी भन्नाट कॅप्शन सुचवा.” नेटकऱ्यांनी त्यांच्या या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ट्विटरकर्त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया – 

सामन्याविषयी बोलायचे झाले तर, भारतीय सलामीवीर गिल आणि अनुभवी कसोटीपटू पुजारा यांनी दुसऱ्या सत्रापर्यंत फलकावर संघाच्या १०० हून अधिक धावा नोंदवल्या आहेत. गिल नाबाद ७३ धावांवर खेळत आहे, तर पुजारा नाबाद १५ धावांवर आहे. आता ही जोडी शतकी भागिदारी होईपर्यंत टिकेल का नाही?, हे पाहणे उत्त्सुकतेचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Test Live : शुभमनच्या अर्धशतकामुळे पहिल्या सत्रात भारताचे वर्चस्व; अद्याप भारताला २४५ धावांची गरज

Video : रोहित शर्माच्या रूपात भारताला पहिला धक्का; टीम पेनने घेतला अप्रतिम झेल

भारतीय संघ या मालिकेत ऑस्ट्रेलियापेक्षा अधिक चांगला खेळला, ‘या’ माजी दिग्गजाने केले कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---