कॅनबेरा येथे मनुका ओव्हलवर खेळविण्यात आलेल्या तिसर्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा १३ धावांनी पराभव केला. त्यामुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्यांदाच विजयाची चव चाखली. तसेच या विजयासह एक अनोखा विक्रम भारतीय संघाने आपल्या नावे केला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यांतील भारतीय संघाचा हा ५३ वा विजय ठरला. भारताने वनडे सामन्यांत सर्वाधिक वेळा पराभूत केलेल्या संघांच्या यादीत आता ऑस्ट्रेलिया संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा १४३ वा सामना खेळतांना भारतीय संघाने ही करामत केली. या यादीत श्रीलंका अव्वल स्थानावर आहे.
यापूर्वी भारतीय संघाने वनडे सामन्यांत इंग्लंडला ५३, तर न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांना प्रत्येकी ५५ वेळा पराभूत केले आहे. तसेच वेस्ट इंडिज ६४ आणि श्रीलंकेला ९१ वेळा वनडेत पराभूत केले आहे.
शेवटचा सामना जिंकत भारताने टाळला व्हाईटवॉश
ऑस्ट्रेलिया दौर्यावर असलेल्या भारतीय संघाने वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करल्याने मालिका गमावली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या राजधानीत खेळविण्यात आलेल्या तिसर्या वनडे सामन्यात भारतीय संघाने १३ धावांनी विजय मिळवत व्हाईटवॉशची नामुष्की टाळली. भारतीय संघाने दिलेल्या ३०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ २८९ धावांवर सर्वबाद झाला. ७६ चेंडूत ९२ धावांची खेळी साकारणारा हार्दिक पंड्या सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला, तर ३ सामन्यांत २ शतकांसह ७२ च्या सरासरीने २१६ धावा काढणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीवन स्मिथने मालिकावीर पुरस्कार पटकाविला.
भारतीय संघाचे वनडे सामन्यांतील सर्वाधिक विजय
९१ विजय- विरुद्ध श्रीलंका
६४ विजय- विरुद्ध वेस्ट इंडिज
५५ विजय- विरुद्ध पाकिस्तान
५५ विजय- विरुद्ध न्यूझीलंड
५३ विजय- विरुद्ध इंग्लंड
५३ विजय- विरुद्ध ऑस्ट्रेलिया*
महत्त्वाच्या बातम्या-
पंड्या-जडेजा जोडीची कमाल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध दीडशतकी भागीदारी करत मोडला १० वर्षापूर्वीचा रेकॉर्ड
Video: आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळायला न मिळालेल्या फलंदाजाची कमाल; ५५ चेंडूत ठोकले दीडशतक
ट्रेंडिंग लेख-
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू
लईच धुतलं! ‘या’ तीन भारतीय फलंदाजांकडून टी२० मध्ये कांगारू गोलंदाजांची सर्वाधिक स्ट्राईक रेटने धुलाई