कसोटी क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचा काल (८ मे) २७वा वाढदिवस होता. ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाने गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी करत मोठे यश मिळवले आहे. कसोटीव्यतिरिक्त आयसीसीच्या वनडे क्रमवारीतील पहिल्या ५ गोलंदाजांमध्ये कमिन्सचा समावेश आहे.
महत्त्वाचे म्हणजे, लहानपणी आपले बोट कापले गेले होते, तरी त्याने गोलंदाजी करणे सोडले नाही आणि आज तो जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. Australia pacer pat cummins lost his right hand finger in childhood due to his sister.
याविषयी बोलताना कमिन्स म्हणाला की, “मी ४ वर्षांचा होतो. एके दिवशी माझी बहीण बाथरूममध्ये असताना मी बाहेर बाथरूमच्या दारावर हात ठेवून उभा राहिलो होतो. तेवढ्यात तिने दार बंद केले आणि माझ्या हाताचे बोट दरवाजामध्ये अडकले. त्यानंतर मला दवाखान्यात नेण्यात आले होते आणि तिथे माझ्या उजव्या हाताचे बोट कापावे लागले होते.”
अशा परिस्थितीत कोणत्याही गोलंदाजाला चेंडू पकडायलाही अडचण येते. पण, कमिंस फक्त योग्य लेंथने गोलंदाजी नाही करत, तर तो ताशी १५० किलोमीटर वेगाने गोलंदाजी करतो.
कमिन्सने त्याच्या २०१५ सालच्या विश्वचषकातील आठवणींना उजाळा दिला आहे. तो म्हणाला की, “२०१५ सालचे विश्वचषक माझ्यासाठी खूप विशेष होते. मी संघाचा भाग बनून खूप आनंदी होतो. तसेच अंतिम सामनाही माझ्यासाठी खास होता.”
आयपीएल २०२०च्या खेळाडू लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने कमिन्सला १५.५० कोटी रुपयांना विकत घेतले होते. यासह तो आयपीएलमध्ये सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. पण, कोरोना व्हायरसमुळे आयपीएल २०२० अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
२७ वर्षीय पॅट कमिन्सबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी…
‘गांगुलीने युवा खेळाडूंसाठी खूप काही केले, पण धोनीने काय केले’






