ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांचे पुढील लक्ष्य भारत असल्याचे ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक आणि काही खेळाडूंनी म्हटले. नुकतेच त्यांनी भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला. त्यामध्ये 18 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, एकाचे तर आंतरराष्ट्रीय पदार्पण असणार आहे. तसेच मिशेल स्टार्क हा पहिल्या सामन्याला मुकणार असून ऑस्ट्रेलियाच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली आहे.
पीटर हँड्सकॉम्ब (Peter Handscomb) याला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आले, मात्र क्लब क्रिकेटमध्ये खेळताना त्याला दुखापत झाली. मंगळवारी (10 जानेवारी) विक्टोरिया क्लबकडून खेळताना पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात त्याला हीप इंज्युरी झाली. पहिला पुल शॉट मारतानाच त्याला दुखापत झाली आणि तो रिटायर्ड हर्ट होत तंबूत परतला. पुन्हा त्याने तोच शॉट खेळला आणि त्याला तीन चेंडू खेळल्यानंतर प्रचंड वेदना जाणवू लागल्या.
क्रिकेट डॉट कॉम एयूने शुक्रवारी (13 जानेवारी) पीटरच्या स्कॅनचा रिपोर्ट सादर केला. ज्यामध्ये त्याची दुखापत गंभीर असल्याचे निष्पन्न झाले. तो फेब्रुवारी महिन्यात भारताच्या दौऱ्यापर्यंत पूर्णपणे फिट होईल अशी आशा ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांना आहे.
स्टार्क नागपूरमध्ये 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीला मुकणार, हे आधीच निश्चित आहे. तसेच कॅमरुन ग्रीन हा पण सुरुवातीच्या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोघांनाही हाताच्या बोटाची दुखापत झाली आहे. ग्रीन पहिल्या सामन्यात नाही खेळला तर पीटरला संधी मिळेल, मात्र त्यासाठी त्यालाही फिट व्हावे लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाने भारतात 2004 नंतर कसोटी मालिका जिंकलेली नाही. यामुळे ते हा नकोसा विक्रम मोडण्याच्या प्रयत्नात असताना तिसरा खेळाडू दुखापतग्रस्त होण खूपच चिंतेची बाब आहे. 2017मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताचा दौरा केला होता, तेव्हा पीटर संघात होता. त्याला आगामी मालिकेसाठी अतिरिक्त फलंदाज म्हणून घेतले आहे. त्याने शेवटचा कसोटी सामना 2019ला खेळला होता.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ:
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ (उपकर्णधार), डेविड वॉर्नर, ऍश्टन एगर, स्कॉट बोलंड, ऍलेक्स कॅरी, कॅमरुन ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वीपसन, लान्स मॉरिस. (Australia Peter Handscomb hip injury ahead of india tour 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीने रिषभलाच पहिल्यांदा दिलेले निवृत्त होण्याचे संकेत, 2019 विश्वचषकावेळी झालेली ही चर्चा
विराट आणि ईशानच्या डान्सने दणाणून सोडले ईडन गार्डन्स, बेधुंद होऊन नाचतानाचा व्हिडिओ भन्नाट व्हायरल