ऑस्ट्रेलियाचा संघ येत्या 22 ऑक्टोबरला संयुक्त अरब अमिराती (युएई) विरुद्ध ऐतिहासिक पहिला आणि एकमेव टी-20 सामना खेळणार आहे. अबु धाबीला होणाऱ्या या सामन्याला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला आहे.
तसेच ऑस्ट्रेलिया संघ 24 ऑक्टोबरपासून पाकिस्तान विरुद्ध तीन टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. युएई विरुद्धच्या सामन्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुर्णपणे मान्याता दिली आहे, असे इंटरनॅशनल क्रिकेट कौंसिलने (आयसीसी) त्यांच्या वेबसाइटवर सांगितले आहे.
“क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा सामना खेळण्यास आम्हाला संधी दिली याबद्दल मी त्यांना धन्यवाद म्हणतो. तसेच पाकिस्तान क्रिकेटने मान्यता दिल्याने मी त्यांचे आभार मानतो”, असे अमिराती क्रिकेट बोर्डचे सदस्य जायेद अब्बास म्हणाले.
तसेच आत्ताच झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला 373 धावांनी पराभूत व्हावे लागले. यामुळे ऑस्ट्रेलियाची कसोटी क्रमवारीत पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.
आयसीसी टी-ट्वेंटी क्रमवारीत युएई 13 तर ऑस्ट्रलिया 3ऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद
–टाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम
–टीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी