भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले आहेत. हे दोन्ही सामने भारताने जिंकत मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. अशात तिसरा सामना मंगळवारी (दि. 28 नोव्हेंबर) गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियाने मालिकेतील 3 सामन्यांसाठी आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक 2023 विजेत्या संघातील सहा सदस्य टी20 मालिकेतून मायदेशी परतणार आहेत.
कोण आहेत ते खेळाडू?
गुवाहाटी (Guwahati) येथे पार पडणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील तिसऱ्या टी20 सामन्यानंतर ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, जोश इंग्लिश आणि सीन ऍबॉट हे खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. विशेष म्हणजे, फिरकीपटू ऍडम झम्पा आणि स्टीव्ह स्मिथ आधीच मायदेशी परतले आहेत.
Australia's updated squad for the 3 remaining T20is against India:
Wade (C), Behrendorff, Tim David, Dwarshuis, Ellis, Chris Green, Hardie, Head, McDermott, Josh Philippe, Sangha, Matt Short and Kane Richardson. pic.twitter.com/AAZprepB8k
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 28, 2023
ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या प्लेइंग इलेव्हन संघात सामील असलेला ट्रेविस हेड भारतातच टी20 संघासोबत राहणार आहे. हेडने ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक 2023 अभियानातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये भाग घेतला नव्हता. मात्र, उपांत्य आणि अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावणारी कामगिरी करत विजयात मोलाचे योगदान दिले.
भारताविरुद्धच्या उर्वरित 3 टी20 सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ
मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरेन्डोर्फ, टीम डेविड, बेन ड्वारशुइस, नेथन एलिस, ख्रिस ग्रीन, ऍरॉन हार्डी, ट्रेविस हेड, बेन मॅकडर्मोट, जोश फिलिप, तन्वीर सांघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन (australia team for t20i vs india 2023 six big changes in australia team against india world cup star players back in team)
हेही वाचा-
मरतानाही विश्वविजेता कर्णधार कमिन्स काढणार विराटच्या विकेटची आठवण, स्वत:च केलाय खुलासा
IPL: प्रतिभावान खेळाडूला रिलीज करून गुजरातने केली मोठी चूक! दुसऱ्याच दिवशी वेगवान शतक ठोकून घडवला इतिहास