---Advertisement---

मेलबर्न कसोटी जरी जिंकली तरी टीम इंडियाच्या ‘या’ तीन खेळाडूंना करावी लागेल सुधारणा

---Advertisement---

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. या सामन्यात भारतीय संघाने जरी विजय मिळवला असला, तरी भारतीय संघाला काही गोष्टीत सुधारणा करण्याची गरज आहे. ज्यामुळे भारतीय संघाचे मालिका जिंकण्याचे स्वप्न भंग होवू शकते. कारण बरेच असे खेळाडू आहेत. ज्यांनी त्यांच्या कामगिरीने निराश केले आहे.

पहिल्या सामन्यातील दोन्ही डावात भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण गचाळ झाले. ज्यामधे भारतीय खेळाडूंनी बरेच सोपे झेल सोडले. ज्यामुळे भारतीय संघाला नुकसान सहन करावे लागले. परंतु दुसर्‍या सामन्यात भारतीय संघाने चांगले पुनरागमन करत विजय मिळवला. मात्र या दोन्ही सामन्यात काही खेळाडू अपयशी ठरले. त्यांना त्यांच्या कामगिरीत वेळीच सुधारणा कराव्या लागणार आहेत. नाहीतर त्याचा फटका भारतीय संघाला बसू शकतो.

या खेळाडूंना सुधारावी लागेल कामगिरी –

1. चेतेश्वर पुजारा

सध्या भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा आपल्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळातून जात आहे. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चेतेश्वर पुजाराच्या नावाचा नावलौकिक झाला होता. मात्र या मालिकेत तो पूर्णपणे अपयशी ठरला आहे. 32 वर्षीय पुजाराने मागील 17 डावात एकही शतक लगावले नाही. शेवटचे शतक त्याने दोन वर्षापूर्वी 2018 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच शतक केले होते.

चेतेश्वर पुजाराने सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दोन सामन्यातील चार डावात फलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने अनुक्रमे 17, 3, 43 आणि 0 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघासाठी ही खूप मोठी डोकेदुखी ठरत चालली आहे.

2. मयंक आगरवाल

सलामी फलंदाजानी चांगली कामगिरी केली तर मागील फलंदाजावर दबाव येत नाही. परंतू भारतीय संघाचा सलामी फलंदाज मयंक अगरवाल हा दोन्ही कसोटी सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्याने चार डावात फलंदाजी करताना अनुक्रमे 17, 9, 0 आणि 5 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो ही या मालिकेत धावा काढण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी या खेळाडूचे अपयश अडचण ठरू शकते.

3. हनुमा विहारी

हनुमा विहारी या खेळाडूने 2018 साली इंग्लंड दौऱ्यात कसोटी संघात पदार्पण केले होते. सलामी फलंदाजीपासून मध्यक्रम ते शेवटच्या फळीतील फलंदाज म्हणूनही त्याने फलंदाजी केली होती. त्याचबरोबर त्याने प्रत्येक ठिकाणी फलंदाजी करताना धावा केल्या होत्या. मात्र या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात आपली छाप सोडता आली नाही.

त्याने पहिल्या दोन सामन्यातील तीन डावात फलंदाजी करताना फक्त 45 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ज्या क्षणी संघाला जास्त गरज होती. त्याच ठिकाणी खराब कामगिरी करताना संघाला निराश केले आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी तो संकटमोचकाची भूमिका पार पाडताना दिसला नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून रविंद्र जडेजाला दिले जाते भारतीय संघात स्थान, रवि शास्त्री यांनी केला खुलासा

सिडनी कसोटीत रोहित शर्माला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार? रवि शास्त्रींनी दिले ‘हे’ उत्तर

डेविड वॉर्नरचे पुनरागमन! असा आहे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---