भारताने सोमवारी (7 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका जिंकत ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
मात्र या मालिकेतील खराब कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कवर मागील काही दिवसांपासून टीका होत आहे. त्याला भारताविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतही 34.53 च्या सरासरीने आणि 3. 28 च्या इकोनॉमी रेटने 13 विकेट्स घेण्यात यश आले. त्यामुळे त्याच्यावर अनेक दिग्गजांनी टीका केली आहे.
पण भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याला पाठिंबा देत त्याच्यावरील टीका आश्चर्यकारक असल्याचे cricket.com.au शी बोलताना म्हटले आहे.
विराट स्टार्कबद्दल म्हणाला, ‘तो खूप कौशल्य असलेला गोलंदाज आहे. तो मानसिकदृष्यापण सकारात्मक गोलंदाज आहे. तो तूमचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्यावर ज्याप्रकारे टीका होत आहे ते पाहून मी चकीत झालो आहे.’
‘तो जर तूमचा सर्वोत्तम गोलंदाज आहे तर तूम्ही त्याला वेळ दिला पाहिजे आणि त्याच्यावर दबाव आणू नये. कारण तूम्ही अशा खेळाडूला गमावू शकत नाही ज्याच्यात कौशल्य आहे आणि जो तूम्हाला सामने जिंकून देऊ शकतो.’
–रोहित शर्माने त्या खेळाडूवर भाष्य करुन जिंकली चाहत्यांची मनं