क्रिकेट खेळतांना अनेक गंमतीजंमती घडत असतात. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान महिला संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात देखील असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. पाकिस्तान महिला क्रिकेट संघ तीन सामन्यांची वनडे आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. वनडे मालिकेतील हा तिसरा आणि शेवटचा सामना सिडनीमध्ये खेळला गेला.
सध्या पाकिस्तान (Pakistan) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) महिला क्रिकेट संघामध्ये (women’s cricket Team) वनडे मालिका (ODI) सुरू आहे. ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघासोबत खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तान महिला संघाला 101 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी 50 षटकांत 9 गडी बाद 336 धावा केल्या, त्यानंतर पाकिस्तानचा संघ 50 षटकांत 7 गडी गमावून 235 धावा करू शकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धुमाकूळ घातला असतानाच दुसरीकडे पाकिस्तानच्या डावात असे काही घडले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
पाकिस्तानी क्रिकेटर (Pakistani cricketer) निदा दार (Nida Dar) फलंदाजी करत असतांना, सामन्याच्या 27 व्या षटकात, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर (Australian cricketer) ताहलिया मॅकग्रा (Tahlia Mc Grath) हीने गोलंदाजी केली. परंतु फलंदाज निदाने चेंडू न टोलवता अचानक स्वत:ला क्रीजपासून दूर केले आणि चेंडू स्टंपला लागला. असे करून निदाने दाखवून दिले की ती बॉल खेळायला अजिबात तयार नव्हती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Nida Dar Out or Not Out !?#AUSvPAK #INDvsNZ#INDvNZ #INDvSL pic.twitter.com/AfYQLTIKiz
— Abdullah Neaz 🇧🇩 (@Neaz__Abdullah) January 21, 2023
त्यामुळे पंचांना हा चेंडू डॉट बॉल म्हणून घोषित करावा लागला. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाज ताहलिया मॅकग्रा ही यावर खूश नसल्याचे दिसून आले. पाकिस्तानी फलंदाजाच्या या घटनेवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. हा सामना जिंकण्यात ऑस्ट्रेलियन संघ यशस्वी ठरला असला तरी चर्चा मात्र पाकिस्तानी खेळाडू निदा दारची होत आहे. तिने लाईव्ह सामन्यात केलेल्या कृत्यामुळे तिची चांगलीच चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियाने मायदेशात खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत पाहुण्या पाकिस्तान संघाला 3-0 अशी मात दिली. (Australia vs Pakistan odi third series Nida Dar Btting viral video on Social Media)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियासाठी धोक्याची घंटी! कसोटी मालिकेपूर्वी बुमराहचा गोलंदाजी सराव, व्हिडिओ जोरदार व्हायरल
बीबीएलमध्ये स्मिथ नावाचं वादळ! शतक ठोकल्यानंतर जे म्हणाला, त्याने ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांचीही उडेल झोप