वेलिंग्टन| न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वनडे विश्वचषक २०२२ चा (Women ODI World Cup 2022) थरार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी संघ त्यांचे सर्वोत्कृष्ट देताना दिसत आहेत. मंगळवारी (२२ मार्च) ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUSW vs SAW), या गुणतालिकेतील अव्वल २ संघांमध्ये विश्वचषकातील २१ वा सामना झाला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ५ विकेट्स राखून पराभूत केले (AUSW Beat SAW) आणि विश्वचषकातील सलग सहावा विजय नोंदवला आहे.
या शानदार विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वाधिक १२ गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिका संघाने यंदाच्या विश्वचषकातील त्यांचा पहिलाच सामना गमावला आहे. ५ पैकी ४ सामने जिंकत ८ गुणांसह हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी कायम आहे.
ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराची शतकी खेळी
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून मेग लॅनिंगने (Meg Lanning) कर्णधार खेळी केली. अवघ्या ४५ धावांवर संघाला २ मोठे धक्के बसल्यानंतर तिने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद १३५ धावांची शानदार खेळी केली. १३० चेंडूंमध्ये १ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने तिने शतक ठोकले.
तिच्याबरोबर तहिला मॅकग्राथ (३२ धावा), ऍश्ले गार्डनर (२२ धावा), ऍनाबेल सदरलँड (नाबाद २२ धावा) आणि बेथ मूनी (२१ धावा) यांनीही छोटेखानी पण उपयुक्त अशा खेळी केल्या. परिणामी ४५.२ षटकांमध्येच ५ विकेट्सच्या नुकसानावर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचे लक्ष्य पूर्ण करत सामना खिशात घातला. या डावात दक्षिण आफ्रिकेकडून शबनीम इस्माईल आणि क्लो ट्रायॉन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या.
https://twitter.com/ICC/status/1506128190351323140?s=20&t=zh70vdQ41lV2rXswnqFOEQ
दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीराची झुंज व्यर्थ
तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर लॉरा वॉलवार्ट हिने ९० धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले गार्डनरने तहिला मॅकग्राथच्या हातून तिला झेलबाद करत तिच्या शतकी खेळीवर पाणी फेरले होते. वॉलवार्टची विकेट गेल्यानंतर कर्णधार सने लूसने चिवट झुंज देत ५२ धावा फटकावल्या होत्या. तसेच सलामीवीर लिझेल ली (३६ धावा), मारीझाने कॅप (३० धावा) यांच्या छोटेखानी खेळींमुळे दक्षिण आफ्रिकेने २७१ धावा फलकावर लावल्या होत्या.
या डावात ऑस्ट्रेलियाकडून मेघन शट, जेस जोनासन, ऍश्ले गार्डनर, ऍनाबेल सदरलेंड आणि ऍलाना किंग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: मुंबईचा कर्णधार रोहितला का आली सारा तेंडूलकरची आठवण? अर्जुनकडे बहिणीची केली चौकशी
Photo | ‘मिशन आयपीएल’साठी विराट कोहली सज्ज, आरसीबीच्या कँपमध्ये केले आगमन
अगग! शतक करूनही संघाला सामना न जिंकवून देऊ शकणारे क्रिकेटर, पंतचाही समावेश