सिडनी। रविवारी(29 सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध श्रीलंका महिला संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 41 धावांनी विजय मिळवला. पण या सामन्याआधी नाणेफेकीवेळी(toss) एक अनोखी गोष्ट पहायला मिळाली.
या सामन्याच्या नाणेफेकीसाठी श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टूबरोबर ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग (Meg Lanning) ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक फलंदाज एसिसा हेलीसह(Alyssa Healy) उपस्थित होती.
त्यामुळे नाणेफेकीसाठी 3 खेळाडू एकाचवेळी उपस्थित राहण्याची दुर्मिळ गोष्ट घडली. यावेळी नाणेफेकीचे नाणेही हेलीने उडवले. या नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला.
पण नाणेफेकीसाठी हेलीला बरोबर का आणले याचे कारण नाणेफेक जिंकल्यानंतर लेनिंगने सांगितले. लेनिंग म्हणाली, ‘मला माहित नाही तूम्ही ऐकले आहे की नाही पण माझ्याबाबतीत नाणेफेकीचा विक्रम खराब सुरु आहे. त्यामुळे एलिसा माझ्याबरोबर आली आणि नाणेफेक आम्ही जिंकलो.’
ही नाणेफेक जिंकल्यानंतर एलिसा हेलीने सेलिब्रेशनही केले.
Wonder if we'll see this move from Meg again in tonight's second T20I? 🤔 #AUSvSL #WatchMe pic.twitter.com/sRakfIPphd
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) September 30, 2019
विशेष म्हणजे आज(30 सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध श्रीलंका महिला संघात पार पडलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यातही लेनिंग हेलीला नाणेफेकीसाठी घेऊन आली होती. मात्र आज श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टूने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पण या सामन्यातही श्रीलंकेला 9 विकेट्सने ऑस्ट्रेलियाने पराभूत केले आणि 3 टी20 सामन्यांच्या मालिकेच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधाराऐवजी संघातील दुसऱ्या खेळाडूने नाणेफेक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागीलवर्षी ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने झिम्बाब्वे विरुद्धच्या टी20 सामन्यासाठी क्विंटॉन डीकॉकला नाणेफेकीसाठी पाठवले होते. विशेष म्हणजे त्या सामन्यात डीकॉक खेळलाही नव्हता. त्यावेळी डीकॉकने नाणेफेक जिंकली होती.
Sadly not! Sri Lanka have won the toss and we’ll be fielding first #AUSvSL #WatchMe
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) September 30, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–रोहित शर्मा- मयंक अगरवाल मैदानात उतरताच ४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडणार ही गोष्ट
–का केले नरेंद्र मोदींनी नदालविरुद्ध हरलेल्या या रशियन टेनिसपटूचे एवढे भरभरुन कौतुक?
–रोहित शर्माने दुखापतग्रस्त धवनला ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक करण्यात अशी केली मदत