ऍरॉन फिंच मागच्या काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय कर्णधारपदावरून पायउतार झाला. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती देखील घेतली. फिंच सध्या ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघाचे नेतृत्व करत असून आगामी टी-20 विश्वचषकात त्यांच्याकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. दरम्यान, अशाही चर्चा रंगल्या आहेत की, विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर फिंच टी-20 प्रकारातून देखील निवृत्ती घेईल. मात्र, आता फिंचने स्वतः या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले आहे.
एरॉन फिंच (Aaron Finch) याने नुकतेच त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीत 100 सामने पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा फिचं पहिला ऑस्ट्रेलियात खेळाडू ठरला आहे. टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याच्या बातम्यांवर फिंचने आता प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे या फॉरमॅटमधून निवृत्तीचा विचारही त्याच्या डोक्यात अजून आला नाहीये आणि ते पुढेही खेळत राहणार आहे.
फिंच म्हणाला की, “मी टी-20 मधून निवृत्ताची विचार केला नाहीये. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणे उत्तम राहिले. माझ्या खांद्यावरचा भार आता थोडा कमी झाल्यासारखं वाटत आहे. हा भार खांद्यावर घेऊन मी मागच्या काही काळात मी खेळत होतो, पण टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याविषयी मी एकदाही विचार केला नाही. हा एक असा फॉरमॅट आहे, जो पाहायला मला आवडतो. सध्या मला फक्त खेळत राहायचे आहे.” फिंचच्या मते आगामी टी-20 विश्वचषकात प्रत्येक संघाला काही प्रमाणात नशिबाची साथही हवी असेल.
“आगामी टी-20 विश्वचषकात काही प्रमाणात नशिबाची साथही हवी आसेल. या फॉरमॅटमध्ये एक व्यक्ती संघाला स्पर्धेतून बाहेर किंवा जिंकवण्यासाठी पुरेसा आहे. मला वाटते आमच्याकडे पुरेसे खेळाडू आहेत, जे संघाला विजय मिळवून देऊ शकतात. अशात आम्ही विरोधकांवर दबाव बनवू शकतो,” असेही फिंच पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, विश्वचषक स्पर्धा 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात खेळला जाणार आहे. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला पहिला सामना 22 ऑक्टोबर रोजी प्रतिस्पर्धी न्यूझीलंडसोबत खेळायचा आहे. त्यानंतर 23 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरार पाहायला मिळणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दीप्तिचे नाव घेत स्टार्कने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड! भारताच्या माजी क्रिकेटपटूने सुनावली खरी खोटी
महिला आशिया चषकात स्म्रीतीचा जलवा! फिफ्टी ठोकत नावावर केला जबरा विक्रम