प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात असा प्रसंग एकदा तरी येतो की, जेव्हा त्याला दुखापतींना सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेका दुखापतीवर शस्त्रक्रिया करावी लागते. हल्लीच ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार अॅरॉन फिंचलासुद्धा एक शस्त्रक्रिया करावी लागली.
३४ वर्षीय सलामीवीर फिंचने सांगितले की, “जेव्हा गेल्या वर्षीच्या इंडियन प्रीमिअर लीग(आयपीएल)साठी आलो, तेव्हा मी स्वत:हून एक गोष्ट जाणून घेतली की, माझ्या डोळ्यांची दृष्टी जरा कमी झाली आहे. त्यामुळे डोळ्यांना जरा त्रास होत आहे. फ्लडलाइट्स खाली तर, अजूनही त्रास होतो. तरी पण, मी फेब्रुवरी आणि मार्च महिन्यात न्यूझीलंडचा दौरा केला होता.”
फिंच पुढे सांगतो की, “लाईट्स आणि चेंडूच्या बाजूला एक वेगळ्याच प्रकाचे डाग दिसू लागले होते. सगळं एकदम धुरकट –धुरकट दिसू लागले होते. या सर्व गोष्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठी चांगल्या नाहीत. मी कॉन्टेक्ट (लेंस) लावणे चालू केले होते. परंतु, माझ्या डोळ्यांमध्ये बसत नव्हते. त्यामुळेच मला असे वाटले की, न्यूझीलंड दौऱ्यानंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी योग्य वेळ आहे. म्हणून मी लगेच न्यूझीलंड दौऱ्यानंतर डोळ्यांची शस्त्रक्रिया करून घेतली. ही प्रक्रिया ३ आठवड्यांपर्यंत चालली आणि यात काहीच अडचण आली नाही.”
त्याने सांगितले की, “मी आता चेंडूला खूप चांगल्या प्रकारे पाहू शकतो. आता फक्त मी इंडोर खेळपट्टीवर सराव करत आहे. मला असे वाटते की, रात्रीच्या सामन्यात खेळताना माझी खरी परीक्षा होईल. कारण, लाईट्समध्ये खेळताना मला त्रास झाला होता.”
फिंचने शस्त्रक्रियेनंतर अजून एकदाही मैदानावर पाउल टाकले नाही. त्यामुळे येत्या वेस्ट इंडीज दौऱ्यामध्ये फिंच कशी फलंदाजी करतो, हे पाहावे लागेल. ऑस्ट्रेलिया संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर ५ टी -२० सामने आणि ३ एकदिवीय सामने खेळणार आहे.
फिंचने सागितलं की, “नवीन खेळाडूंसाठी सध्याचा वेस्ट इंडीज दौरा महत्वाचा असून आगामी मालिकांसाठी त्यांची संघात निवड होऊ शकते.”
वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघाचे १८ सदस्य जाणार आहेत. या संघात डेविड वार्नर, पॅट कमिंस आणि ग्लेन मॅक्सवेल यांसारख्या खेळाडूंचा समावेश नाही. जैवसुरक्षेत वातावरणा होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी आपली नावे मागे घेतली आहेत आणि दुखापत झालेला स्टीव स्मिथ सुद्धा या संघाचा भाग नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
कमालीचे अष्टपैलू खेळाडू! व्हीव्हीएस लक्ष्मणने वेगवेगळ्या काळातील ‘या’ दोन खेळाडूंचे केले कौतुक
‘विराटशी मैदानात वाद घालण्याचा भानगडीत मी पडणार नाही’, टीम इंडियाच्या युवा खेळाडूची प्रतिक्रिया